मेरा भाषणही है शासन, 41 महिन्यात मोदींची 775 भाषणं

प्रत्येक महिन्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरासरी 19 भाषणं दिल्याचं समोर आलं आहे.

मेरा भाषणही है शासन, 41 महिन्यात मोदींची 775 भाषणं

नवी दिल्ली : 'मेरा वचन ही मेरा शासन है' हा 'बाहुबली 2' मधला शिवगामीचा डायलॉग बराच गाजला होता. मात्र त्याऐवजी आता 'मेरा भाषण ही मेरा शासन है' हे वाक्य जास्त फेमस होतंय की काय, असं वाटू लागलं आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर 41 महिन्यात तब्बल 775 जाहीर भाषणं केली आहेत.

प्रत्येक महिन्याला मोदींनी सरासरी 19 भाषणं दिल्याचं समोर आलं आहे. म्हणजेच दर तीन दिवसांपैकी दोन दिवस त्यांनी जाहीर सभांमधून भाषण केल्याचं म्हणू शकतो. बहुतेक भाषणं ही किमान 30 मिनिटांची होती.

त्याउलट मनमोहन सिंग यांनी 10 वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कालावधीत 1 हजार 401 भाषणं दिली. म्हणजेच महिन्याला सरासरी 11 भाषणं दिली. पण अवघ्या तीन वर्षात मोदींनी भाषणबाजीत मनमोहन सिंग यांना मागे टाकलं आहे.

मोदींच्या भाषणाविषयी महत्त्वाचे मुद्दे :

सप्टेंबर 2014 मध्ये एका महिन्यात मोदींची 31 भाषणं

एप्रिल 2015 मध्ये मोदींच्या 32 जाहीर सभा

2015 मध्ये मोदींची जाहीर सभांमध्ये 264 भाषणं

नोव्हेंबर 2015 या एकाच महिन्यात मोदींची 36 भाषणं

बिहार निवडणुकीसाठी घेतलेल्या 4 सभांचाही समावेश

परदेशांमधील भारतीयांसमोर मोदींची 166 भाषणं

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV