पंतप्रधान मोदींचं रशियातील गुंतवणूकदारांना निमंत्रण

पंतप्रधान मोदींचं रशियातील गुंतवणूकदारांना निमंत्रण

सेंट पीटर्सबर्ग : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियातील इंटरनॅशनल इकॉनॉमिक फोरममध्ये सहभाग घेत जगभरातल्या गुंतवणूकदारांचं लक्ष भारतीय अर्थव्यवस्था आणि व्यवसायाकडे वेधलं. गुंतवणुकीसाठी जगभरातल्या गुंतवणूकदारांना त्यांनी निमंत्रित केलं. या फोरममध्ये जगभरातील एक हजार ग्लोबल इन्व्हेस्टर्सचा समावेश होता.

मोदींनी जगभरातील गुंतवणूकदारांना भारतीय युवाशक्तीची जाणिवही करुन दिली. भारतातील युवा वैज्ञानिकांनी पहिल्याच प्रयत्नात मंगळयान पाठवलं. हॉलिवूडमध्ये एक सिनेमा बनवायला जेवढा पैसा लागतो, त्यापेक्षाही कमी किंमतीत भारताचे युवा वैज्ञानिक मंगळावर यान पाठवतात, असं मोदी म्हणाले. मोदींच्या या वाक्यानंतर सर्वांनी टाळ्याचा कडकडाट केला.

भारत आणि रशियाचे संबंध विश्वासावर : मोदी

केवळ विश्वासावर संबंध अवलंबून असणारे कमी देश आहेत. रशिया आणि भारताचे संबंध गेल्या 70 वर्षांपासून विश्वासावर टिकून आहेत, असं विश्वासाने सांगू शकतो. जगात अनेक बदल झाले, मात्र भारत-रशिया संबंध चांगले होत गेले, असं म्हणत मोदींनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनाही शुभेच्छा दिल्या.

भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था : मोदी

भारतातील सव्वाशे कोटी जनतेचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे. गेल्या तीन वर्षांपासून देशाच्या जनतेने पंतप्रधान म्हणून सेवा करण्याची संधी दिली. भारतात अनेक वर्षांनंतर संपूर्ण बहुमताने सरकार आलं आहे. त्यामुळे कोणताही निर्णय विश्वासाने घेण्यासाठी सक्षम आहोत. भारताचा सध्याचा वार्षिक जीडीपी 7 एवढा आहे. भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे, असं मोदींनी जगभरातील गुंतवणूकदारांना सांगितलं.

जीएसटीमुळे परदेशातील गुंतवणूकदारांना फायदा : मोदी

भारतात वेगाने बदल होत आहेत. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारतातील प्रत्येक राज्याचा वेगवेगळा कायदाही आहे. त्यामुळे एखाद्या कंपनीला विविध राज्यात व्यवसाय करायचा असल्यास वेगवेगळे कर मोजावे लागत होते. मात्र आता जीएसटीमुळे संपूर्ण देशात एकच करप्रणाली लागू होईल. जे परदेशातील गुंतवणूकदारांसाठी फायद्याचं आहे, असं मोदी म्हणाले.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV