नवी दिल्ली : देशातील लघु उद्योगांना सहज कर्ज" /> नवी दिल्ली : देशातील लघु उद्योगांना सहज कर्ज" /> नवी दिल्ली : देशातील लघु उद्योगांना सहज कर्ज" /> नवी दिल्ली : देशातील लघु उद्योगांना सहज कर्ज" />

PM Narendra Modi to launch MUDRA Bank today

By: | Last Updated: 08 Apr 2015 02:12 AM
PM Narendra Modi to launch MUDRA Bank today

नवी दिल्ली : देशातील लघु उद्योगांना सहज कर्ज पुरवठा व्हावा, या उद्देशाने घोषित केलेल्या मुद्रा बँकेचं आज उद्घाटन होणार आहे. अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या या बँकेचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होईल.

 

या बँकेतून लघु उद्योजकांना 10 लाखांपर्यंतचं कर्ज सहज उपलब्ध होणार आहे. यासाठी सरकारने एकूण 20 हजार कोटींची तरतूद केली आहे. या बँकेच्या मध्यमातून लघु उद्योगांना कर्ज देण्यासाठी देशातील इतर बँकांना प्रोत्साहनही देण्यात येईल. शिवाय या कर्ज योजनांच्या नियमनाचं कामही मुद्रा बँकेच्या हाती असेल.

 

मुद्रा योजनेत तीन श्रेणी असतील. त्यांचं शिशू, किशोर आणि तरुण या गटांमध्ये वर्गीकरण करण्यात आलं आहे. शिशू श्रेणीअंतर्गत 50,000 रुपयांचं कर्ज मिळू शकतं, तर किशोर श्रेणीत 50,000 रुपयांपासून 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिलं जाईल. तसंच तरुण श्रेणीअंतर्गंत 5 लाख रुपयांपासून 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळेल.

 

मुद्रा बँकेद्वारे छोट्या कारखानदारांना आणि दुकानदारांना कर्ज मिळेल. त्याचबरोबर भाजीवाले, सलून यांनाही लोन दिलं जाईन असं कळतं. पंतप्रधान मुद्रा योजनेत प्रत्येक सेक्टरनुसार स्कीम बनवली जाईल. प्रत्येक सेक्टरमध्ये वेगवेगळ्या स्कीम असतील.

India शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV