जी-20 परिषदेत मोदींनी पाकिस्तानला खडसावलं!

By: | Last Updated: > Saturday, 8 July 2017 7:45 AM
PM Narendra Modi unveils 10 point action plan for fight against Terrorist in G20 Summit 2017 latest updates

हॅमबर्ग (जर्मनी) : जी-20 शिखर परिषदेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला खडसावलं आहे. काही देश दहशतवादाचा आधार घेऊन स्वत:चे राजकीय हेतू साध्य करत असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं.

‘जैश-ए-मोहम्मद’ आणि ‘लष्कर-ए-तोयबा’सारख्या दहशतवादी संघटना जगासाठी घातक आहेत. त्यामुळे जी-20 देशांनी दहशतवादाविरोधात एकत्र येण्याचं आवाहनही मोदींनी केलं.

इंटरनेट, सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना दहशतवादाकडे खेचलं जात आहे, असे सांगत मोदींनी स्थितीचं गांभिर्य लक्षात आणून दिलं. यावेळी मोदींनी दहशतवादाविरोधात लढण्यासाठी ‘10 पॉईंट्स अॅक्शन प्लॅन’ही मांडला. सगळ्या देशांनी दहशतवादाच्या विरोधात एकत्रित लढा दिला पाहिजे, अशी भूमिका यावेळी मोदींनी मांडली.

दहशतवादाविरोधात काय आहे मोदींचा ‘10 पॉईंट्स अॅक्शन प्लॅन’?

  1. दहशतवादाला समर्थन देणाऱ्या देशांवर कठोर कारवाई करावी. किंबहुना, अशा देशांना जी-20 मध्ये सहभागी होण्यास बंदी आणावी.
  2. संशयित दहशतवाद्यांची यादी जी-20 देशांनी एकमेकांना देणं गरजेचं आहे. त्यानंतर दहशतवादी आणि त्यांना समर्थन देणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी.
  3. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी सर्वच देशांनी एकमेकांना सहकार्य करायला हवं. शिवाय, दहशतवाद्यांच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया अधिक सोपी करण्याची गरजही आहे.
  4. संयुक्त राष्ट्र संघाने सूचवलेल्या उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी व्हावी.
  5. धर्माच्या नावावर दुही माजवणाऱ्यांविरोधात जी-20 देशांमध्ये वैचारिक देवाण-घेवाण व्हावी.
  6. दहशतवाद्यांची आर्थिक मदत रोखणं गरजेचं असून, त्यासाठी आवश्यक कारवाई करावी.
  7. दहशतवाद्यांना शस्त्र आणि स्फोटकं पुरवणाऱ्यांवर आणि खरेदी-विक्रीवर कारवाईसाठी टास्क फोर्सची स्थापना करावी.
  8. सर्वच देशांनी दहशतवादी संघटनांना पाठबळ देणं बंद करायला हवं.
  9. सायबर सुरक्षा महत्त्वाची असून, त्यासाठी जी-20 देशांनी पुढाकार घेतला पाहिजे.
  10. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी जी-20 देशांमध्ये सुरक्षा सल्लागारांची नेमणूक करावी.

India News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:PM Narendra Modi unveils 10 point action plan for fight against Terrorist in G20 Summit 2017 latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

आमदार रवी राणांचा दावा खरा ठरला, महाराष्ट्रातील 22 मतं फुटली!
आमदार रवी राणांचा दावा खरा ठरला, महाराष्ट्रातील 22 मतं फुटली!

नवी दिल्ली : राष्ट्रपती निवडणुकीत महाराष्ट्रातील विरोधकांची मतं

शिमल्यात बस दरीत कोसळली, 28 जणांचा मृत्यू
शिमल्यात बस दरीत कोसळली, 28 जणांचा मृत्यू

शिमला (हिमाचल प्रदेश) : शिमल्यात एका भीषण अपघातात 28 जणांचा मृत्यू

रामनाथ कोविंद देशाचे नवे राष्ट्रपती
रामनाथ कोविंद देशाचे नवे राष्ट्रपती

नवी दिल्ली : देशाचे 14 वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांच्या

एकाच वेळी 21 बँकांचं विलीनीकरण, सरकार ऐतिहासिक निर्णयाच्या तयारीत
एकाच वेळी 21 बँकांचं विलीनीकरण, सरकार ऐतिहासिक निर्णयाच्या तयारीत

नवी दिल्ली : देशातील सरकारी बँकांची संख्या लवकरच 21 हून 11 किंवा 12 वर

भारताचे चौदावे राष्ट्रपती कोण? निकाल अवघ्या काही तासांवर
भारताचे चौदावे राष्ट्रपती कोण? निकाल अवघ्या काही तासांवर

नवी दिल्ली : रामनाथ कोविंद की मीरा कुमार, भारताचे चौदावे राष्ट्रपती

तिबेटच्या डोंगराळ भागात चीनकडून हजारो टन युद्धसामुग्रीची आयात
तिबेटच्या डोंगराळ भागात चीनकडून हजारो टन युद्धसामुग्रीची आयात

नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवर तिबेटच्या डोंगराळ भागात चीनच्या

स्पेशल रिपोर्ट : पाकिस्तानने 'असं' अडकवलं कुलभूषण जाधवांना
स्पेशल रिपोर्ट : पाकिस्तानने 'असं' अडकवलं कुलभूषण जाधवांना

मुंबई : कुलभूषण जाधव… मराठमोळा माजी नौदल अधिकारी.. कुलभूषण सध्या

तो मदत मागत राहिला, पण बायको-मुलाने प्राण सोडले
तो मदत मागत राहिला, पण बायको-मुलाने प्राण सोडले

होशंगबाद (मध्य प्रदेश) : दुचाकी अपघातानंतर रस्त्याच्या मधोमध तो

विश्व हिंदू परिषदेकडून मनोहर पर्रिकरांच्या राजीनाम्याची मागणी
विश्व हिंदू परिषदेकडून मनोहर पर्रिकरांच्या राजीनाम्याची मागणी

नवी दिल्ली : विश्व हिंदू परिषदेने गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर

मराठमोळ्या पोलीस आयुक्तांकडून तेलंगणातील नागरिकांसाठी नवी सुविधा
मराठमोळ्या पोलीस आयुक्तांकडून तेलंगणातील नागरिकांसाठी नवी सुविधा

रचकोंडा (तेलंगणा): तेलंगणातील रचकोंडा पोलिसांनी नागरिकांसाठी