‘जय जपान, जय इंडिया...’, पंतप्रधान शिंजो आबेंकडून नारा

‘जय जपान, जय इंडिया...’ असा नारा जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी बुलेट ट्रेनच्या भूमिपूजन सोहळ्यावेळी दिला.

‘जय जपान, जय इंडिया...’, पंतप्रधान शिंजो आबेंकडून नारा

साबरमती : ‘जय जपान, जय इंडिया...’ असा नारा जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी बुलेट ट्रेनच्या भूमिपूजन सोहळ्यावेळी दिला. पंतप्रधान मोदी आणि शिंजो आबे यांनी आज (गुरुवार)  देशातील सर्वात पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचं गुजरातमधील साबरमतीमध्ये भूमिपूजन केलं.

या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त शिंजो आबे यांनी उपस्थितांसमोर जपानीत भाषणही केलं. त्यांचं हे भाषण हिंदीत भाषांतर करुन सांगण्यात येत होतं. शिंजो आबे भाषणात नेमकं काय म्हणाले यावर एक नजर टाकूयात.

नमस्कार... अशी मराठमोळी सुरुवात त्यांनी केली... पण त्यानंतरचं संपूर्ण भाषण त्यांनी जपानीत केलं. 'बुलेट ट्रेनचा भूमिपूजन सोहळ्यामुळे मला खूप आनंद झाला. यामुळे भारत आणि जपानचे संबंध आणखी दृढ झाले आहे.' असं सुरुवतीलाच शिंजो आबे म्हणाले.

'1964 साली जपानमध्ये पहिली बुलेट ट्रेन धावली. आता पंतप्रधान मोदींनी देखील बुलेट ट्रेनचं स्वप्न पाहिलं आहे. त्यामुळे जपान आणि भारताचे इंजिनीअर मिळून हा प्रोजेक्ट पूर्णत्वास नेतील. जपानमधून 100 इंजिनीअर भारतात आले आहेत.’ अशी माहिती शिंजो आबे यांनी दिली.‘पंतप्रधान मोदी हे जागतिक आणि दूरदर्शी नेते आहेत. सामर्थ्यवान भारत हा जपानचं हितसंबंध पाहतो तर सामर्थ्यवान जपान हा भारताचं हितसंबंध पाहतो.’ असं म्हणत आबे यांनी भारत आणि जपानमध्ये दृढ मैत्री असल्याचं म्हटलं.

‘बुलेट ट्रेन हा जगातील सर्वात सुरक्षित प्रवास आहे. जपानमध्ये आजपर्यंत कोणताही मोठा अपघात झालेला नाही. त्यामुळे भारतात देखील आम्हीच अशाच प्रकारच्या सुरक्षिततेकडे लक्ष देऊ.’ असंही आबे म्हणाले.

यावेळी बोलताना शिंजो आबे यांनी डोकलाम वादावर चीनचं नाव न घेता निशाणा साधला, 'ताकदीच्या जोरावर सीमेमध्ये बदल करण्यास आमचा विरोध आहे.' शेवटी बोलताना आबे म्हणाले की, 'जर जपानचं JA आणि इंडियाचं I एकत्र आल्यास 'जय' होतो. जय भारत, जय जपान...'

दरम्यान, भारतातील या बुलेट ट्रेनसाठी जपान भारताला 88 हजार कोटी देणार आहेत.

संबंधित बातम्या :
देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचं भूमिपूजन संपन्न

शिंजो आबेंचं जोरदार स्वागत, अहमदाबादेत आबे-मोदींचा रोड शो

बुलेट ट्रेन ते गिफ्ट सिटी… मुंबईचं महत्त्व कमी करण्यासाठी मोदी सरकारचा डाव?

शिंजो आबे यांच्यासाठी डिनरला गुजराती-जपानी पक्वान्नं

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV