पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानचाच भाग : फारुख अब्दुल्ला

पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानचाच भाग असून तो कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही, असं वादग्रस्त वक्तव्य जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांनी केलं आहे. काश्मीरचा जो भाग भारताकडे आहे तो भारताचाच भाग राहील असंही त्यांनी म्हटलं आहे.

पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानचाच भाग : फारुख अब्दुल्ला

नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानचाच भाग असून तो कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही, असं वादग्रस्त वक्तव्य जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांनी केलं आहे. काश्मीरचा जो भाग भारताकडे आहे तो भारताचाच भाग राहील असंही त्यांनी म्हटलं आहे.

फारुख अब्दुल्ला म्हणाले की, "पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानचाच भाग असून तो कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. यावरुन कितीही युद्ध झालं तरी हे बदलणार नाही, त्यामुळं दोन्ही देशातील काश्मिरी जनतेला स्वायत्तता द्यायला हवी,"

वास्तविक, फारुख अब्दुल्ला जो पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानचा भाग असल्याचं सांगत आहेत, तो पाकिस्तानने बळकावलेला भाग आहे. ऑक्टोबर 1947 रोजी पाक सैन्याने जम्मू-काश्मीरवर हल्ला केला होता. यावेळी भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. पण काश्मीरचा काही भाग बळकावून पाकने त्यावर आपला दावा केला.

दुसरीकडे पाकव्याप्त काश्मीरवरुन फारुख अब्दुल्लांच्या वक्तव्याचं बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांनी समर्थन केलं आहे. ऋषी कपूर यांनी ट्वीट करुन यावर आपलं मत मांडलं आहे.ऋषी कपूर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, “फारुख अब्दुलाजी नमस्कार! मी तुमच्या मताशी सहमत आहे. जम्मू-काश्मीर आमचाच आहे. आणि पाकिस्तान त्यांचा. हा एकच पर्याय आहे. ज्या माध्यमातून या प्रश्नावर तोडगा काढता येईल. याशिवाय मी आता वयाची 65 वर्षे पूर्ण केली आहेत. मृत्यूपूर्वी पाकिस्तान पाहण्याची इच्छा आहे की माझ्या मुलांनी त्यांची मूळ पाहावं. बास करा सर, जय माता दी..”

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: pok belongs to pakistan says farooq abdullah
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV