राहुल गांधी राम तर मोदी रावणाच्या रुपात, अमेठीत पोस्टर वॉर

राहुल गांधींच्या या दौऱ्यानिमित्त अमेठीत पोस्टर वॉर सुरु झालं आहे.

राहुल गांधी राम तर मोदी रावणाच्या रुपात, अमेठीत पोस्टर वॉर

लखनऊ: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर पहिल्यांदाच त्यांचा मतदारसंघ असलेल्या अमेठीचा दौरा करणार आहेत. आजपासून दोन दिवस राहुल गांधी उत्तर प्रदेशातील अमेठीत असतील.

राहुल गांधींच्या या दौऱ्यानिमित्त अमेठीत पोस्टर वॉर सुरु झालं आहे. एका पोस्टरमध्ये राहुल गांधींना राम तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रावणाच्या भूमिकेत दाखवण्यात आलं आहे.

राहुल गांधींच्या हातात धनुष्य बाण तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना दहा शीर असलेल्या रावणाच्या रुपात दाखवलं आहे.

या पोस्टरवर  ‘राहुल के रूप में भगवान राम का अवतार. 2019 में आएगा राहुल राज’, असं लिहिण्यात आलं आहे.

राहुल गांधी हे 2004 पासून अमेठी लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी विद्यमान केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा पराभव केला.

दरम्यान, राहुल गांधी अमेठीत रोड शो आणि पदयात्रा काढणार आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून आतापासूनच तयारी करण्यात येत आहे.

उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागा आहेत. 2014 मध्ये यापैकी केवळ अमेठी आणि रायबरेली या दोनच जागी काँग्रेसचा विजय झाला होता.  तर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अमेठीत एकही जागा मिळाली नाही.

त्यामुळे भाजपचा विजयरथ रोखण्यासाठी राहुल गांधींना उत्तर प्रदेशात जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: poster war in Uttar Pradesh before rahul Gandhis amethi visit, rahul as ram and pm modi as ravan
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV