यूपी विधानसभेत अत्यंत भयंकर पीईटीएन स्फोटकं सापडली!

यूपी विधानसभेत अत्यंत भयंकर पीईटीएन स्फोटकं सापडली!

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या विधानसभेत पीईटीएन नामक अत्यंत धोकादायक स्फोटकं आढळली. आज विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, “विधानसभेत स्फोटकं मिळणं, हा दहशतवादी कटाचा भाग आहे. त्यामुळे या घटनेची एनआयए चौकशी व्हावी.”. शिवाय, चौकशीनंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन योगी आदित्यनाथ यांनी दिले.

योगी आदित्यनाथ म्हणाले, “विधानसभेच्या आतल्या भागातील सुरक्षेची जबाबदारी केवळ सरकारची नसते. तर आपल्या सर्वांचीच असते. त्यामुळे सर्वांनीच आपापल्या सुरक्षेसाठी सतर्कता बाळगली पाहिजे.”

ज्याने कुणी स्फोटकं ठेवण्याचा कट रचला आहे, त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई होईल, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. शिवाय, या घटनेच्या निषेधार्थ प्रस्ताव विधानसभेत आणण्याचं योगींनी सर्व आमदार आणि मंत्र्यांना आवाहन केलं.

विधानसभेत कधी स्फोटकं सापडली?

दोन दिवसांपूर्वी म्हणजे 12 जुलै रोजी उत्तर प्रदेशच्या विधानसभेत स्फोटकं सापडली. फॉरेन्सिक तपासानंतर स्फोटकांना दुजोरा देण्यात आला. मात्र, डेटोनेटर मिळाले नाहीत. 150 ग्रॅम इतकी ही स्फोटकं होती.

12 जुलै रोजी सकाळी उत्तर प्रदेश विधानसभेत ज्या ठिकाणी सर्व पक्षांचे आमदार बसतात, त्याच ठिकाणी स्फोटकं मिळाली. समाजवादी पक्षाचे आमदार मनोज पांडे यांच्या सीटखाली ही स्फोटकं मिळाली. निळ्या रंगाच्या पिशवीत विधानसभेत ही स्फोटकं ठेवण्यात आली होती.

पीईटीएन काय आहेत?

पीईटीएन अत्यंत धोकादायक स्फोटकं मानली जातात. ही गंधहीन स्फोटकं सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागणं अत्यंत कठीण असतं. किंबहुना, प्रशिक्षित कुत्र्यांनाही सापडत नाहीत. मेटल डिटेक्टरही या स्फोटकांना पकडू शकत नाही. कमी प्रमाणातील पीईटीएनचा स्फोट मात्र अत्यंत मोठा होतो. लष्कर आणि खाण उद्योगासाठी या स्फोटकांचा वापर केला जातो. तेही विशिष्ट परिस्थितीतच याचा वापर होतो. अशा एकंदतरीत स्थितीत उत्तर प्रदेश विधानसभेत ही स्फोटकं पोहोचल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेश विधानसभेत स्फोटकं सापडल्यानंतर दिल्लीतील संसद परिसरासह लोकसभा, राज्यसभेतही चौकशी केली जात आहे. खासदार बसतात त्या प्रत्येक सीटखाली तपासणी केली जात आहे. सुरक्षा वाढवून सतर्कता बाळगण्याच्य दृष्टीने काटेकोरपणे लक्ष दिले जात आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV