पीपीएफ खातं आता पाच वर्षांच्या आत बंद करता येणार

मूळ रक्कम आणि व्याजावर सरकारची हमी असल्यामुळे अल्प बचत योजना अत्यंत सुरक्षित मानल्या जातात.

पीपीएफ खातं आता पाच वर्षांच्या आत बंद करता येणार

नवी दिल्ली : पीपीएफ (पब्लिक प्रॉव्हिडंट फंड) अकाऊण्ट उघडल्यानंतर पाच वर्षांच्या आधी बंद करणं आता शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे लहान बचत योजनांमध्ये कोणाचंही नामांकन करणं अनिवार्य असेल. अर्थ विधेयकातील एका खास तरतुदीअंतर्गत हे शक्य होणार आहे.

पीपीएफसह अनेक छोट्या बचत योजनांशी निगडीत कायदे आणि नियम बंद करण्याचा आणि सरकारी बचत बँक अॅक्ट 1873 मध्ये बदल करुन एकच नियमावली तयार करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

पीपीएफ अकाऊण्ट उघडल्यानंतर पाच वर्षांच्या आधी बंद करणं शक्य होईल. सद्य कायद्यानुसार पीपीएफ खातं पाच वर्षांच्या कालावधीत बंद करण्याची मुभा नाही. मात्र यापुढे पीपीएफ खात्यासह सर्व अल्प बचत योजना पाच वर्षांच्या आत बंद करता येतील. नवी मुदत आणि अटी अद्याप उघड करण्यात आलेली नाही.

पीपीएफ आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रासारख्या छोट्या बचत योजनांच्या माध्यमातून आयकरमध्ये सूट मिळवण्याची तरतूद आहे. या योजनांसाठी दर तीन महिन्यांनी व्याजदरांचं समीक्षण केलं जातं.

प्रस्तावित व्यवस्थेत सद्य आणि नव्या ठेवीदारांना कोणताही फटका बसत नसल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे. मूळ रक्कम आणि व्याजावर सरकारची हमी असल्यामुळे अल्प बचत योजना अत्यंत सुरक्षित मानल्या जातात.

18 वर्षांखालील म्हणजे अल्पवयीन व्यक्तींच्या नावे उघडलेल्या खात्यांच्या बाबतीत अनेकदा अडचणी येतात. ठेवीदाराचा मृत्यू झाला आणि कोणाचं नामांकन नसल्यास निश्चित मर्यादेपेक्षा जास्तीची रक्कम कायदेशीर वारसदाराला मिळते. त्यासाठी वारसदार प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक असतं.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: PPF, small savings scheme subscribers may close accounts prematurely latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV