प्रद्युम्न हत्या : अल्पवयीन आरोपीविरुद्ध सज्ञानाप्रमाणे खटला चालणार!

8 सप्टेंबर रोजी गुरुग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलच्या वॉशरुममध्ये प्रद्युम्न ठाकूरची गळा चिरुन हत्या करण्यात आली होती.

प्रद्युम्न हत्या : अल्पवयीन आरोपीविरुद्ध सज्ञानाप्रमाणे खटला चालणार!

गुरुग्राम : हरियाणाच्या गुरुग्राममधील प्रद्युम्न हत्याकांडातील आरोपी विद्यार्थ्याला सज्ञान समजलं जाईल आणि त्यानुसारच त्याच्यावर खटला चालणार आहे. ज्युवेनाईल जस्टिस बोर्डाने हा महत्त्वपूर्ण निकाल असून हे प्रकरण जिल्हा सत्र न्यायालयाकडे वर्ग केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 डिसेंबरला होणार आहे.

8 सप्टेंबर रोजी गुरुग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलच्या वॉशरुममध्ये प्रद्युम्न ठाकूरची गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी यानंतर संपूर्ण देशात मुलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. परीक्षा आणि पालक-शिक्षक मीटिंग टाळण्यासाठी अकरावीच्या विद्यार्थ्याने प्रद्युम्नची गळा चिरुन हत्या केल्याचं सीबीआय तपासात समोर आलं होतं.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने ज्युवेनाईल कोर्टात याचिका दाखल करुन अल्पवयीन आरोपीवर सज्ञानाप्रमाणे खटला चालवण्याची मागणी केली होती. तसंच प्रद्युम्नच्या पालकांनीही आरोपीवर सज्ञानाप्रमाणे खटला चालवण्याची मागणी होती. कोर्टाने या याचिकेवर सुनावणी करताना सीबीआयच्या मागणीला परवानगी दिली.

प्रद्युम्नचं दप्तर माझ्यासाठी कवच बनलं, आरोपी विद्यार्थ्याची कबुली

काय आहे प्रकरण?
8 सप्टेंबर रोजी गुरुग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलच्या वॉशरुममध्ये प्रद्युम्न ठाकूरची गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. सुरुवातीला दुसरीत शिकणाऱ्या सात वर्षीय विद्यार्थी प्रद्युम्न ठाकूरसोबत दुष्कृत्यचा प्रयत्न केल्यानंतर हत्या केल्याचं म्हटलं जात होतं.

याप्रकरणी स्कूल बसचा कंडक्टर अशोक कुमारसह तीन जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी अशोक कुमारने हत्या केल्याची कबुली दिली होती. पण नंतर कोर्टात त्याने जबाब फिरवला. दबावात येऊन मी हत्या केल्याची कबुली दिली होती, असं अशोक कुमारने सांगितलं.

“आमच्या मुलाच्या हत्येमागे आणखी कोणाचातरी हात असू शकतो,” असा संशय प्रद्युम्नच्या आई-वडिलांनी व्यक्त केला होता.

यानतंर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी 15 सप्टेंबर रोजी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता.

पियानो क्लासमुळे प्रद्युम्न-आरोपीची ओळख
प्रद्युम्न आणि आरोपी विद्यार्थी पियानो क्लासमध्ये एकत्र शिकत होते. त्यामुळेच ते दोघे एकमेकांना ओळखत होते. प्रद्युम्न दोन वर्षांपासून पियानो क्लासला जात होता, असं त्याच्या पालकांनीही सांगितलं होतं.

काऊन्सलिंगदरम्यान शनिवारी आरोपी विद्यार्थ्याने बालन्यायालयासमोर सांगितलं की, "8 सप्टेंबरला सकाळी शाळेत पोहोचल्यानंतर मी दप्तर वर्गात ठेवलं आणि सोहना मार्केटमधून खरेदी केलेला चाकू घेऊन तळमजल्यावर आलो. वॉशरुममध्ये प्रद्युम्नचा गळा चिरल्यानंतर त्याने रक्ताची उलटी केली आणि चाकूवर पडला. यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली."

परीक्षा टाळण्यासाठी हत्या
परीक्षा आणि पालक-शिक्षक मीटिंग टाळण्यासाठी अकरावीच्या विद्यार्थ्याने प्रद्युम्नची गळा चिरुन हत्या केल्याचं सीबीआय तपासात समोर आलं. महत्त्वाचं म्हणजे प्रद्युम्न आणि आरोपी विद्यार्थी एकमेकांना चांगले ओळखत होते. तसंच आरोपी विद्यार्थ्याने प्रद्युम्नला फसवून वॉशरुममध्ये नेलं आणि तिथे त्याची हत्या केली.

प्रद्युम्नचं दप्तर कवच बनलं!
आरोपी विद्यार्थी प्रद्युम्नला ओळखत होता, त्यामुळे कोणाच्याही मदतीशिवाय तो त्याला सहजरित्या वॉशरुममध्ये घेऊन गेला आणि त्याचा गळा चिरला. सीबीआयनुसार आरोपीने सांगितलं की, "प्रद्युम्नच्या पाठीवर दप्तर होतं, जे माझ्यासाठी कवच बनलं. दप्तरामुळे माझ्या कपड्यांवर रक्ताचे डाग किंवा शिंतोडे उडाले नाहीत. यानतंर चाकू वॉशरुममध्येच सोडून बाहेर पडलो आणि माळी तसंच शिक्षकांना याची माहिती दिली."

गुन्हा वदवून घेण्यासाठी पोलिसांचा कंडक्टरवर दबाव
गुरुग्राम पोलिसांनी जाणीवपूर्वक अनेक पुराव्यांकडे दुर्लक्ष करुन ते नष्ट करण्याचे प्रयत्न केले होते. यानंतर बस कंडक्टरला दोषी ठरवण्यासाठी पुरावे तयार करण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या कॉल रेकॉर्डचा तपास सुरु आहे, असं सीबीआयच्या तपासात समोर आलं आहे.

याआधी हरियाणा पोलिसांनी बस कंडक्टर अशोक कुमारकडून गुन्हा वदवून घेण्यासाठी दबाव टाकला होता. तसंच कोऱ्या कागदावर त्याची स्वाक्षरीही घेतली होती. दबावात येऊन त्याने मीडियासमोर प्रद्युम्नच्या हत्या केल्याची कबुली दिली होती. यानंतर अनेक पोलिस कर्मचाऱ्यांवर संशय बळावला होता.

संबंधित बातम्या

परीक्षा आणि पालक-शिक्षक मीटिंग टाळण्यासाठी प्रद्युम्नची हत्या : सीबीआय

प्रद्युम्न हत्याकांड : चौकशीसाठी तीनजण सीबीआयच्या ताब्यात


प्रद्युम्न हत्या : शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर


प्रद्युम्न हत्या : वडिलांची याचिका, सुप्रीम कोर्टाची हरियाणा सरकार, शाळेला नोटीस

लैंगिक शोषणानंतर 7 वर्षांच्या मुलाची गळा चिरुन हत्या, बस कंडक्टर अटकेत


प्रद्युम्न हत्या : वडिलांची याचिका, सुप्रीम कोर्टाची हरियाणा सरकार, शाळेला नोटीस

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Pradyuman Thakur murder case: Accused to be tried as adult : Juvenile Justice Board
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV