महाराष्ट्राच्या सुपुत्रासह सर्जिकल स्ट्राईकच्या हिरोंना शौर्य पुरस्कार

By: | Last Updated: > Tuesday, 21 March 2017 10:53 AM
महाराष्ट्राच्या सुपुत्रासह सर्जिकल स्ट्राईकच्या हिरोंना शौर्य पुरस्कार

नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या नायकांचा शौर्य पुरस्काराने गौरव करण्यात आला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते सर्जिकल स्ट्राईकचं नेतृत्व करणाऱ्या मेजर रोहित सुरी यांचा कीर्तीचक्र देऊन सन्मान करण्यात आला.

तसंच यावेळी महाराष्ट्राचे लेफ्टनंट जनरल सुपुत्र राजेंद्र निंभोरकर यांचाही गौरव केला.

सर्जिकल स्ट्राईकचं नेतृत्व करणाऱ्या मेजर रोहित सुरींना देशातील दुसऱ्या सर्वोच्च शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते मेजर सुरी यांना कीर्तीचक्र प्रदान करण्यात आलं. तर लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांना उत्तम युद्ध सेवेचं मेडल प्रदान केलं.

पठाणकोट हल्ल्यात दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिलेले भारतीय वायूसेनेचे अधिकारी गुरसेवक सिंह यांना मरणोत्तर शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रपती भवनात उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री अरुण जेटली यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा

उरी हल्ल्यानंतर आक्रमक झालेल्या भारताने थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून हल्ला चढवला. भारतीय जवानांनी दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करुन, 38 ते 40 अतिरेक्यांचा खात्मा केला.  भारतीय लष्कराच्या ‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती आज महासंचालक (लष्करी कारवाई) डीजीएमओ लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांनी दिली.

“दहशतवादी एलओसी पार करुन भारतात घुसण्याच्या तयारीत होते. मात्र त्याची कुणकुण भारताला लागली. भारतीय जवानांनी थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून अतिरेक्यांचा खात्मा केला”, असं रणबीर सिंह म्हणाले.

इतकंच नाही तर भारतीय लष्कर कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सज्ज असल्याचंही रणबीर सिंह यांनी ठणकावून सांगितलं.

“घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राईक केले. यामुळे शत्रूचं मोठं नुकसान झालं. आमच्या सर्जिकल स्ट्राईकचा उद्देश केवळ दहशतवाद्यांना मारणं हेच होतं, जे सीमेवरुन भारतात घुसण्याचा प्रयत्नात होते. आम्हाला हे जास्त वाढवायचं नाही”, असं रणबीर सिंह म्हणाले.

यावेळी रणबीर सिंह यांनी भारताकडून सर्जिकल स्ट्राईक्स केल्याचं सांगितलं. तसंच या सर्जिकल स्ट्राईक्सची माहिती लष्कराने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती, जम्मून काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना दिली होती, असं रणबीर सिंह यांनी सांगितलं.

सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय?
पाकिस्तान सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन करून अतिरेकी तसंच घातपाती कारवाया करत आहे. भारत स्वतःहून कधीही शस्त्रसंधीचं उल्लंघन करत नाही. पाकिस्तानच्या गोळीबाराला गोळीबारानेच प्रत्युत्तर दिलं जातं. मात्र काल रात्री भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये  सर्जिकल स्ट्राईक्स करून पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं आहे.

सर्जिकल स्ट्राईक ही युद्धशास्त्रातील एक संज्ञा आहे. सर्जिकल स्ट्राईकमध्ये  निष्णात सर्जन ज्या पद्धतीने शस्त्रक्रिया करताना नेमक्या ठिकाणची शस्त्रक्रिया करतो, त्याच प्रमाणे आपल्याला अपेक्षित असलेल्या ठिकाणी नेमकी तसंच परिणामकारण आणि अचूक शस्त्र कारवाई म्हणजे सर्जिकल स्ट्राईक…

थोडक्यात सर्जिकल स्ट्राईक म्हणजेच अतिशय नेमकेपणाने केलेली लष्करी कारवाईच असते. गावाकडच्या भाषेत घुसून मारणं.

सर्जिकल स्ट्राईकमध्ये मोठं नुकसान टाळण्यावर भर दिला जातो. आपल्याला अपेक्षित ठिकाणावरच नेमका हल्ला करणं म्हणजेच सर्जिकल स्ट्राईक होय.

साधारणपणे विमानांद्वारे करण्यात येणाऱ्या बॉम्बहल्ल्यात आपल्याला अपेक्षित ठिकाणापेक्षा आजूबाजूच्या परिसराचीही मोठी हानी होत असते. भारताने काल रात्री पाकव्याप्त काश्मीरमधील अतिरेक्यांच्या प्रशिक्षण केंद्राना लक्ष्य करत सर्जिकल स्ट्राईक केले.

संबंधित बातम्या :

होय, आम्ही LOC पार करुन अतिरेक्यांचा खात्मा केला : इंडियन आर्मी

सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय?

ही कारवाई उरी हल्ल्यातील जवानांना श्रद्धांजली, कुटुंबीयांची भावना

काश्मीर मांगो गे तो चीर देंगे, भाजप कार्यालयाबाहेर जल्लोष

शांततेला आमचा दुबळेपणा समजू नका, पाकिस्तानच्या उलट्याबोंबा

अभिनंदन मोदीजी… उद्धव ठाकरेंचा पंतप्रधानांना फोन

सर्जिकल स्ट्राईक: वेळ आणि ठिकाण आठ दिवसांपूर्वीच ठरलं होतं!

First Published:

Related Stories

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 27/05/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 27/05/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 27/05/2017 1.    बारावीच्या निकालाची तारीख

पीएफसाठी पगारातून 12 ऐवजी 10 टक्के रक्कम कटणार?
पीएफसाठी पगारातून 12 ऐवजी 10 टक्के रक्कम कटणार?

पुणे : प्रॉव्हिडेंट फंड अर्थात पीएफच्या बाबतीत ईपीएफओ एक महत्वाचा

लष्कराच्या कारवाईत ठार झालेला सबजार अहमद कोण?
लष्कराच्या कारवाईत ठार झालेला सबजार अहमद कोण?

जम्मू-काश्मीर: सबजार अहमद भट्ट… बुरहान वानीचा उत्तराधिकारी,

रावणाचा वध कुणी केला?
रावणाचा वध कुणी केला?

मुंबई : रावणाचा वध रामाने केला, हाच इतिहास आतापर्यंत सांगितला जात

मोदी-नितीश... ये रिश्ता क्या कहलाता हैं!
मोदी-नितीश... ये रिश्ता क्या कहलाता हैं!

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी बोलावलं तर ते आले

‘साबण, शॅम्पूने आंघोळ करा मगच योगींसमोर या’, अधिकाऱ्यांचा फतवा
‘साबण, शॅम्पूने आंघोळ करा मगच योगींसमोर या’, अधिकाऱ्यांचा फतवा

कुशीनगर : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांच्या

लष्कराच्या कारवाईत बुरहान वानीचा उत्तराधिकारी सबजार अहमदचा खात्मा
लष्कराच्या कारवाईत बुरहान वानीचा उत्तराधिकारी सबजार अहमदचा...

जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीपच्या रामपूर सेक्टरमधून घुसखोरी

निवडणूक आयोगाच्या हॅकेथॉनसाठी केवळ राष्ट्रवादीचा अर्ज
निवडणूक आयोगाच्या हॅकेथॉनसाठी केवळ राष्ट्रवादीचा अर्ज

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाचं ईव्हीएम हँकिंग चँलेंज

रिपोर्ट कार्ड : निराशाजनक कामगिरी असणारे मोदी सरकारमधील पाच मंत्री
रिपोर्ट कार्ड : निराशाजनक कामगिरी असणारे मोदी सरकारमधील पाच मंत्री

नवी दिल्ली : अच्छे दिनचा नारा देत सत्तेत आलेल्या मोदी सरकारला तीन

नितीन गडकरी अव्वल, मोदी सरकारचे टॉप पाच मंत्री
नितीन गडकरी अव्वल, मोदी सरकारचे टॉप पाच मंत्री

नवी दिल्ली : अच्छे दिनचा नारा देत सत्तेत आलेल्या मोदी सरकारला तीन