गुजरातचा भाजप आमदार कोविंद यांच्या विरोधात मतदान करणार

राष्ट्रपती निवडणुकीसाठी देशभरातील आमदार आणि खासदार मतदान करणार आहेत. मात्र एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना मतदान करणार नसल्याचं वक्तव्य गुजरातमधील एका भाजप आमदाराने केलं आहे.

By: | Last Updated: > Monday, 17 July 2017 11:31 AM
presidential election 2017 gujarat bjp candidate nalin kotadia will vote against bjp

गांधीनगर : राष्ट्रपती निवडणुकीसाठी देशभरातील आमदार आणि खासदार मतदान करणार आहेत. मात्र एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना मतदान करणार नसल्याचं वक्तव्य गुजरातमधील एका भाजप आमदाराने केलं आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधील आमदारच एनडीएला मतदान करणार नसल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

गुजरात सरकारने पाटीदार समाजाच्या 14 जणांची हत्या केली असून आमच्या मागण्याही मान्य केलेल्या नाहीत. त्यामुळे भाजपला मतदान करणार नाही, असं भाजप आमदार नलिन कोटडिया यांनी एबीपी न्यूजशी बोलताना जाहीरपणे स्पष्ट केलं.

पक्षाला माझ्यावर कारवाई करायची असती तर दोन वर्षांपूर्वीच केली असती. मला पक्षातून निलंबित केलं तरीही त्याची चिंता नाही, असंही कोटडिया यांनी सांगितलं.

तुम्ही भाजपच्या विरोधात आहात की रामनाथ कोविंद यांच्या, हा प्रश्नही कोटडिया यांना विचारण्यात आला. पण आपण भाजपच्या विरोधात असल्याचं कोटडिया यांनी स्पष्ट केलं. गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप आमदाराचं हे वक्तव्य भाजपसाठी चिंता वाढवणारं आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सकाळी 10 ते 5 या वेळेत संसद भवन आणि विधानसभांमध्ये खासदार आणि आमदार मतदानाचा हक्क बजावतील. या निवडणुकीत एका खास पद्धतीने तयार करण्यात आलेल्या पेनाने मतदान करण्यात येणार आहे.

India News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:presidential election 2017 gujarat bjp candidate nalin kotadia will vote against bjp
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

भारताकडे फक्त 10 दिवसांपुरताच शस्त्रसाठा, 'कॅग'चे ताशेरे
भारताकडे फक्त 10 दिवसांपुरताच शस्त्रसाठा, 'कॅग'चे ताशेरे

नवी दिल्ली : सीमेपलिकडे चीनच्या कुरापती सुरु असताना भारताला चिंतेत

रेल्वेत मिळणारे खाद्यपदार्थांवर कॅगचे ताशेरे
रेल्वेत मिळणारे खाद्यपदार्थांवर कॅगचे ताशेरे

दिल्ली : रेल्वे प्रवासादरम्यान मिळणाऱ्या खाण्यावर कॅगनं ताशेरे

राम जन्मभूमी प्रकरणी लवकरच सुनावणी, सुप्रीम कोर्टाची तयारी
राम जन्मभूमी प्रकरणी लवकरच सुनावणी, सुप्रीम कोर्टाची तयारी

नवी दिल्ली : राम जन्मभूमी प्रकरणावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता

मी स्वत:ला काँग्रेसमधून मुक्त करतोय : शंकरसिंह वाघेला
मी स्वत:ला काँग्रेसमधून मुक्त करतोय : शंकरसिंह वाघेला

गांधीनगर : गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. मागील काही

मेंदूवर शस्त्रक्रिया सुरु असताना 'तो' गिटार वाजवत होता!
मेंदूवर शस्त्रक्रिया सुरु असताना 'तो' गिटार वाजवत होता!

बंगळुरु : मेंदूवर शस्त्रक्रिया सुरु असताना ऑपरेशन टेबलवर रुग्ण

निवृत्तीच्या दिवशीच पीएफ मिळणार, केंद्र सरकारचा महत्वपूर्ण निर्णय
निवृत्तीच्या दिवशीच पीएफ मिळणार, केंद्र सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली: केंद्र सरकारनं नोकरदार वर्गासाठी एका आनंदाची बातमी

तणावादरम्यान अजित डोभाल चीन दौऱ्यावर जाणार!
तणावादरम्यान अजित डोभाल चीन दौऱ्यावर जाणार!

नवी दिल्ली : डोकलाम मुद्द्यावरुन भारत-चीन दरम्यान तणावाचं वातावरण

आमदार रवी राणांचा दावा खरा ठरला, महाराष्ट्रातील 22 मतं फुटली!
आमदार रवी राणांचा दावा खरा ठरला, महाराष्ट्रातील 22 मतं फुटली!

नवी दिल्ली : राष्ट्रपती निवडणुकीत महाराष्ट्रातील विरोधकांची मतं

शिमल्यात बस दरीत कोसळली, 28 जणांचा मृत्यू
शिमल्यात बस दरीत कोसळली, 28 जणांचा मृत्यू

शिमला (हिमाचल प्रदेश) : शिमल्यात एका भीषण अपघातात 28 जणांचा मृत्यू

रामनाथ कोविंद देशाचे नवे राष्ट्रपती
रामनाथ कोविंद देशाचे नवे राष्ट्रपती

नवी दिल्ली : देशाचे 14 वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांच्या