याकूबच्या फाशीला विरोध करणाऱ्या गांधींना पाठिंबा नाही: संजय राऊत

मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनच्या फाशीला विरोध करणाऱ्या गोपाळकृष्ण गांधी यांना, उपराष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही, असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी म्हटलं.

By: | Last Updated: 17 Jul 2017 02:32 PM
याकूबच्या फाशीला विरोध करणाऱ्या गांधींना पाठिंबा नाही: संजय राऊत

नवी दिल्ली:  मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनच्या फाशीला विरोध करणाऱ्या गोपाळकृष्ण गांधी यांना, उपराष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही, असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी म्हटलं.

काँग्रेसकडून गोपालकृष्ण गांधी उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली आहे.

शिवसेनेच्या आमदार- खासदारांनी राष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा दिला आहे. यावेळी झालेल्या मतदानानंतर संजय राऊत यांनी गोपालकृष्ण गांधी यांना तीव्र विरोध दर्शवला.

संजय राऊत म्हणाले, "मी सोनिया गांधींना विचारु इच्छितो, की संकुचित विचारधारा म्हणजे काय? मॅडमजी, कशाच्या आधारे गोपालकृष्ण गांधींना उमेदवारी दिली? मुंबईत 1993 साली झालेल्या बॉम्बस्फोटातील दोषी, याकूब मेमनच्या फाशीला विरोध करणाऱ्या गोपाळकृष्ण गांधी यांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही"

याशिवाय "गोपालकृष्ण गांधी यांनी याकूबची फाशी रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. त्यासाठी त्यांनी राष्ट्रपतींनाही पत्र लिहिलं होतं. याकूबची फाशी होऊ नये असं त्यांनी देशासमोर म्हटलं होतं. त्यामुळे संकुचित विचाराचं कोण आहे, हे सोनिया गांधींनी सांगावं", असंही संजय राऊत म्हणाले.

https://twitter.com/ANI_news/status/886819348026769410

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV