राष्ट्रपती निवडणुकीत अमित शाहांना मतदानाचा हक्क कसा?

देशाच्या 14 व्या राष्ट्रपतीपदासाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. थोड्याच वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी मतदान केलं.

राष्ट्रपती निवडणुकीत अमित शाहांना मतदानाचा हक्क कसा?

नवी दिल्ली/मुंबई: देशाच्या 14 व्या राष्ट्रपतीपदासाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. थोड्याच वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी मतदान केलं.

भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी, उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही मतदानाचा हक्क बजावला.

मात्र अमित शाह हे राष्ट्रपती निवडणुकीत मतदान कसे करु शकले, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. केवळ भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत म्हणून त्यांनी मतदान केलं का? तसा त्यांना अधिकार असतो का? असेही प्रश्न उपस्थित होत आहेत.

पण अमित शाह हे गुजरातचे विद्यमान आमदार आहेत. त्यांनी भाजप अध्यक्ष म्हणून नव्हे तर गुजरातचे आमदार म्हणून राष्ट्रपती निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला.

या निवडणुकीत विधानसभा आणि लोकसभा-राज्यसभेचे सदस्य मतदान करु शकतात. त्यामुळे अमित शाह यांनी आमदार म्हणून मतदान केलं.

गुजरात विधानसभेच्या 2012 मध्ये झालेल्या निवडणुकीत अमित शाह हे नाराणपुरा मतदारसंघातून निवडून आले आहेत.

 कोविंद विरुद्ध मीरा कुमार

राष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद आणि यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांच्यात थेट लढत आहे. मात्र पाठिंब्याचा विचार केला तर सध्या तरी कोविंद यांचं पारडं जड मानलं जात आहे.

मुंबईतही मतदानाची रेलचेल

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मुंबईतही आमदारांचं मतदान होत आहे. विशेष म्हणजे जेलमध्ये असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ आणि आमदार रमेश कदमही यांनाही मतदानाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळं हे दोघेही मतदान करतील.

संबंधित बातम्या

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतांची आकडेवारी कशी? 

छगन भुजबळ, रमेश कदम तासाभरासाठी जेलमधून सुटणार

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV