... म्हणून एअर इंडियाने राष्ट्रपतींच्या मुलीला ग्राऊंड ड्युटी लावली

एअर इंडियामध्ये एअर होस्टेस म्हणून कार्यरत असलेल्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मुलगी स्वातीला कंपनी व्यवस्थापनाने ग्राऊंड ड्युटी लावली आहे.

... म्हणून एअर इंडियाने राष्ट्रपतींच्या मुलीला ग्राऊंड ड्युटी लावली

नवी दिल्ली : एअर इंडियामध्ये एअर होस्टेस म्हणून कार्यरत असलेल्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मुलगी स्वातीला कंपनी व्यवस्थापनाने ग्राऊंड ड्युटी लावली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याचं एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, "राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मुलगी स्वाती एअर इंडियाच्या बोईंग 787 आणि 777 विमानात केबिन क्रू म्हणून काम करते. पण आता तिची एअर इंडियाच्या मुख्यालयातील को-ऑर्डिनेशन डिपार्टमेंटमध्ये ड्युटी लावली आहे.

2007 मध्ये इंडियन एअरलाईन्स आणि एअर इंडियाचं विलिनीकरण झाल्यानंतर, एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांसाठी हा विभाग काम करतो.

कंपनीच्या सूत्रांनी सांगितलं की, "राष्ट्रपतींची मुलगी असल्याने, विमान उड्डाणानंतर तिला कडक सुरक्षा व्यवस्थेत काम करावं लागतं. त्यामध्ये इतर प्रवाशांच्या सीट ब्लॉक कराव्या लागतात. हे शक्य नसल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

रामनाथ कोविंद यांच्या मुलीबद्दल पाच महत्त्वाचे मुद्दे

  • स्वाती ऑस्ट्रेलिया, युरोप आणि यूएस यासारख्या लांबच्या प्रवासातील विमान प्रवासात एअर इंडियासाठी ड्युटी करते.

  • आपली खरी ओळख कोणालाही कळू नये, यासाठी ती आपल्या नावासोबत आडनाव लावत नाही.

  • विशेष म्हणजे, रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेण्यापूर्वी स्वाती ही त्यांची मुलगी असल्याचं तिच्या इतर सहकाऱ्यांनाही माहित नव्हतं.

  • नोकरीसाठी तिने कधीही वडिलांचं राजकीय वजन वापरलं नाही. तिने अधिकृत नोंदणीमध्येही वडिलांचं नाव आरएन कोविंद असं लिहिलं आहे.

  • याबद्दल विचारलं असता ती म्हणाली की, लहानपणापासूनच तिच्या वडिलांनी स्वावलंबी बनण्याची शिकवण दिली होती.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: presidents ramnath kovinds daughter moved to ground duties at air india for security purposes
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV