एक आँसू भी हुकूमत के लिए ख़तरा है..., राहुल गांधींची मोदींवर टीका

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नोटाबंदीविरोधात ट्विटरवरुन थेट शायरीच्या माध्यमातून मोदी सरकारवर टीका केली आहे.

एक आँसू भी हुकूमत के लिए ख़तरा है..., राहुल गांधींची मोदींवर टीका

मुंबई : नोटाबंदी वर्षपूर्तीच्या निमित्तानं काँग्रेस आणि विरोधकांनी मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. याचवेळी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नोटाबंदीविरोधात ट्विटरवरुन थेट शायरीच्या माध्यमातून मोदी सरकारवर टीका केली आहे.

"एक आँसू भी हुकूमत के लिए ख़तरा है, तुमने देखा नहीं आँखों का समंदर होना." या मुन्नवर राणांच्या शायरीसोबत डोळ्यात आसू असलेल्या एका व्यक्तीचा फोटो राहुल गांधींनी आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे.

rahul Gandhi tweet-

नोटाबंदीनंतर बँकेच्या रांगेत उभ्या असलेल्या व्यक्तीच्या डोळ्यात आसू आले होते. हाच फोटो त्यावेळी कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्यानंतर आज राहुल गांधींनी मुन्नवर राणांची शायरी शेअर करत हा फोटो पुन्हा शेअर केला.

दरम्यान, याचबरोबर राहुल गांधींनी आणखी एक ट्विटही केलं आहे. 'पंतप्रधान मोदींनी कोणताही विचार न करता घेतलेल्या निर्णयामुळे कोट्यावधी इमानदार लोकांचं आयुष्य बरबाद झालं. त्या सर्व लोकांच्या आम्ही पाठिशी आहोत.'नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त विरोधक आज देशभरात काळा दिवस साजरा करणार आहेत. तसेच काँग्रेस आज रात्री 8 वाजता देशभरात कॅण्डल मार्च काढणार आहे.

संबंधित बातम्या :

नोटाबंदीचं एक वर्ष : देश किती कॅशलेस झाला?

नोटाबंदीची वर्षपूर्ती: नोटाबंदीवेळी मोदींनी केलेलं भाषण जसंच्या तसं!

सरकारचा 'काळे धन विरोधी दिन', तर विरोधकांचा 'काळा दिवस'

नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपकडून तीन व्हिडीओ रिलीज

जयंत पाटलांनी मोदींना पाठवल्या खेळण्यातल्या नोटा!

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: rahul gandhi attacks modi government on twitter latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV