विकासाला काय झालं?, राहुल गांधींकडून मोदींच्या विकास मॉडेलची खिल्ली

गुजरात दौऱ्यावर असलेल्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. एका सभेत बोलताना राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकास मॉडेलची खिल्ली उडवली.

विकासाला काय झालं?, राहुल गांधींकडून मोदींच्या विकास मॉडेलची खिल्ली

अहमदाबाद : गुजरात दौऱ्यावर असलेल्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. एका सभेत बोलताना राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकास मॉडेलची खिल्ली उडवली. विकास को क्या हुआ है? असा प्रश्न उपस्थित करताच. विकास वेडा झाला आहे असं उत्तर सभेला उपस्थित असणाऱ्यांनी दिलं.

तसेच गुजरातचं सरकार रिमोट कंट्रोलनं चालतं आणि हा रिमोट दिल्लीतून ऑपरेट केला जातो, असा टोलाही राहुल गांधी यांनी यावेळी लगावला. दुसरीकडे पटेल समाजावर मोदी सरकारनं गोळीबार केला. पण काँग्रेसला सर्वांना एकत्र घेऊन पुढे जायचं आहे, असं म्हणत राहुल गांधींनी पाटीदार समाजाला साद घालण्याचा प्रयत्न केला.

सभेला संबोधित करताना राहुल गांधींनी 'विकासाला काय झालं?' असा प्रश्न विचारला. त्यावेळी उपस्थित जनसमुदायाकडून 'विकास वेडा झाला आहे,' अशी प्रतिक्रिया आली. त्यावरुनच राहुल गांधींनी विकासाची खिल्ली उडवत मोदी सरकारवर निशाणा साधला.

काय म्हणाले राहुल गांधी?


दरम्यान, गेल्या 19 वर्षांपासून गुजरातमध्ये भाजप सरकार सत्तारुढ आहे. जवळपास नरेंद्र मोदींनी राज्याची सूत्रं सांभाळल्यानंतर, आता देशाचं पंतप्रधान पद भूषवत आहेत. पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळवून देण्याची त्यांची इच्छा आहे.

पंतप्रधान मोदींना यावेळी निवडणूक प्रचारात पटेल समाजाची नाराजीचा सामना करावा लागू शकतो. काही महिन्यांपूर्वी पटेल समाजाच्या आरक्षणाची मागणी करत हार्दिक पटेल राज्याचं राजकीय वातावरण चांगलंच ढवळून काढलं होतं.

सध्या हार्दिक पटेल यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींच्या दौऱ्याचं स्वागत करत, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेससोबत हातमिळवणी करण्याचे संकेत दिले आहेत.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV