मोदीजी, पैशांनी गुजरातचा आवाज विकत घेता येणार नाही : राहुल गांधी

गुजरातमधील ओबीसी नेते अल्पेश ठाकोर यांनी आज राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

मोदीजी, पैशांनी गुजरातचा आवाज विकत घेता येणार नाही : राहुल गांधी

गांधीनगर : गुजरात विधानसभा निवडणुकीआधी कॅश स्कँडलवर वाद सुरु असतानाच काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गांधीनगरमध्ये एका सभेला संबोधित केलं. पैशांनी गुजराचचा आवाज विकत घेता येणार नाही, असं राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी यांनी जय भीमच्या नाऱ्यासह भाषणाची सुरुवात करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

गुजरातमधील ओबीसी नेते अल्पेश ठाकोर यांनी आज राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधताना गुजरातमध्ये 5 ते 10 उद्योजकांची सरकार असल्याचं म्हटलं. तर गुजरातमधील समाज रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहे.

गुजरातमध्ये 30 लाख तरुण बेरोजगार
राहुल गांधी म्हणाले की, "22 वर्षात गुजरातमध्ये जनतेचं सरकार स्थापन झालेलं नाही. यामुळे गुजरातमध्ये 30 लाख तरुण बेरोजगार आहेत."

गुजरातचा आवाज विकत घेता येणार नाही
गुजरातमधील कँश स्कँडलवर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, "पैशांनी गुजरातचा आवाज विकत घेता येणार नाही. पंतप्रधान मोदी 'मन की बात' करतात, पण मला गुजरातच्या 'मन की बात' सांगायची आहे. गुजरातच्या तरुणांना शिक्षण हवंय, पण गुजरातचं सरकार 5 ते 10 उद्योजकांच्या हातात दिलं आहे."

'मेक इन इंडिया' फेल!
"गुजरातमध्ये केवळ श्रीमंतांचं कर्ज माफ होतं, गरिबांचं नाही. मल्ल्याचं कर्ज कमी करण्यावर चर्चा सुरु आहे," असं राहुल गांधी म्हणाले. शिक्षण व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत राहुल गांधी म्हणाले की, "कॉलेजमध्ये 10 ते 15 लाख रुपये मागितले जातात. नॅनो कार बनवण्यासाठी 30 ते 35 हजार कोटी रुपये एका कंपनीला देण्यात आले, पण त्या पैशांमधून किती नॅनो कार बनवल्या?," असा सवालही काँग्रेस उपाध्यक्षांनी मोदींना विचारला आहे. "या पैशांमधून गुजरातमधील शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं असतं, पण तुम्ही त्यांचा आवाज ऐकला नाही, असंही ते म्हणाले. देशातील 'मेक इन इंडिया' हा उपक्रम फेल झाला आहे."

"संपूर्ण देशाचा बजेट द्या, संपूर्ण जगाचा पैसा लावा, पण गुजरातचा आवाज दाबू शकत नाही," असंही राहुल गांधीं नमूद केलं.

जीएसटी आणि जय शाहवर वार
या सभेदरम्यान, राहुल गांधींनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहाचें पुत्र जय शाह यांच्या प्रकरणातही हल्लाबोल केला. "न खाऊंगा न खाने दूंगा, असं म्हणणाऱ्या पंतप्रधानांनी या प्रकरणावर अजूनही मौन बाळगलं आहे. जय शाहच्या प्रकरणात ते काही बोलणार नाहीत," असं राहुल गांधी म्हणाले. यासोबतच राहुल गांधी नोटाबंदबाबर सरकारला लक्ष्य केलं आहे. "नोटाबंदीच्या 5-6 दिवसात आपल्या चुकीची जाणीव झाली होती. नोटाबंदीतून मोदींनी अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली," असा घणाघात त्यांनी केला.

राहुल गांधींनी यावेळी जीएसटीवरुनही सरकारवर हल्लाबोल केला. "जीएसटी म्हणजे गब्बर सिंह टॅक्स असून देशातील जनतेवर तो जबरदस्तीने थोपवला आहे," असं राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधीचं भाषण

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV