राहुल गांधी आज काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरणार!

सोनिया गांधी सलग 19 वर्ष काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या, आता ही जबाबदारी राहुल गांधी यांच्यावर सोपवली जाण्याची शक्यता आहे.

राहुल गांधी आज काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरणार!

नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये आजपासूनच 'राहुल राज'ची तयारी सुरु होत आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आज अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अध्यक्षपदासाठी आतापर्यंत कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल, अशी शक्यता आहे.

सोनिया गांधी सलग 19 वर्ष काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या, आता ही जबाबदारी राहुल गांधी यांच्यावर सोपवली जाण्याची शक्यता आहे.

काँग्रेस मुख्यालयात पक्षाचे 900 नेते उपस्थित राहणार
राहुल गांधी उमेदवारी अर्ज भरताना पक्षाचे देशभरातील 900 नेते काँग्रेस मुख्यालयात उपस्थित राहतील. राहुल गांधींच्या उमेदवारीचा कार्यक्रम भव्य बनवण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने नेते दिल्लीतील अकबर रोड इथल्या मुख्यालयात दाखल होणार आहेत.

काँग्रेसच्या निवडणूक प्रक्रियेनुसार, अध्यक्षपदाच्या निवणुकीत 10 AICC सदस्यांनी उमेदवारासाठी प्रस्ताव ठेवणं आवश्यक असतं. मिळालेल्या माहितीनुसार, 10 AICC सदस्यांचे 90 ग्रुप राहुल गांधींचा प्रस्ताव देतील.

काँग्रेस अध्यक्षपदासाठी आजपासून निवड प्रक्रिया

निवडणूक प्रक्रियेआधी राहुल गांधी राजघाटावर
सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचा देखील राहुल गांधींना प्रस्ताव देणाऱ्यांमध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. या निवडणूक प्रक्रियेआधी राहुल गांधी राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते मंदिरातही जाणार असल्याची शक्यता आहे.

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया
- काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे.
- उद्या म्हणजेच 5 डिसेंबरला अर्जांची छाननी करुन वैध उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल.
- यानंतर 11 डिसेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे.
- एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास 19 डिसेंबर रोजी मतदान होईल.
- जर मतदान झालं तर 19 डिसेंबरलाच नव्या अध्यक्षाची घोषणा केली जाईल.

दरम्यान, गेल्या काही दिवसात विरोधी सूर उमटले असले तरी राहुल गांधी यांचा काँग्रेस अध्यक्ष होण्याचा मार्ग आजच मोकळा होईल, हे जवळपास निश्चित आहे.

स्वातंत्र्यानंतरचे काँग्रेसचे अध्यक्ष आणि त्यांचा कालावधी
1) आचार्य कृपलानी – 1947
2) पट्टाभी सितारामय्या – 1948-49
3) पुरुषोत्तमदास टंडन – 1950
4) जवाहरलाल नेहरु – 1951-54
5) यू. एन. धेबर – 1955-59
6) इंदिरा गांधी – 1959
7) नीलम संजीव रेड्डी – 1960–63
8) के. कामराज – 1964–67
9) निजलिंगअप्पा - 1968
10) जगजीवनराम – 1970–71
11) शंकर दयाळ शर्मा – 1972–74
12) देवकांत बरुआ – 1975-77
13) इंदिरा गांधी – 1978–84
14) राजीव गांधी – 1985–91
15) पी. व्ही नरसिंहराव – 1992–96
16) सिताराम केसरी – 1996–98
17) सोनिया गांधी – 1998 ते आजपर्यंत

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Rahul Gandhi to file his nomination for party top post today , Rahul Gandhi News Marathi
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV