5 वर्षात 27 पराभव, राहुल गांधींचं नाव 'गिनीज बुक'मध्ये?

By: | Last Updated: > Monday, 20 March 2017 11:22 PM
5 वर्षात 27 पराभव, राहुल गांधींचं नाव 'गिनीज बुक'मध्ये?

नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचं नाव ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदवण्यासाठी एका विद्यार्थ्याने पुढाकार घेतला आहे. देशभरात 27 निवडणुकांमध्ये पराभवांचा सामना करावा लागल्याचा विक्रम त्यांच्या नावे नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे.

राहुल गांधी यांना गेल्या काही वर्षांत राजकीय कारकीर्दीत कठीण काळाला सामोरं जावं लागलं आहे. देशभरात काँग्रेसचे सलग पराभव झाल्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. मध्य प्रदेशच्या होशंगबादमधील इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असलेल्या विशाल दिवाणने ‘गिनीज बुक’कडे यासंदर्भात मागणी केली आहे.

पाच वर्षांच्या कालावधीत काँग्रेस पक्षाचे 27 वेळा पराभव झाले आहेत. राहुल गांधींच्या सक्रिय सहभागामुळेच पक्षाची हार झाल्याचं दिवाणचं म्हणणं आहे. विशालने गिनीज बुक प्रशासनाकडे याबाबत लेखी मागणी केली आहे. त्याचा अर्ज प्राप्त झाल्याचं पत्र मिळालं
असलं तरी ही मागणी मान्य होणार का नाही, याबाबत अद्याप उत्तर आलेलं नाही.

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये चार राज्यांत भाजपला सत्ता मिळाली, तर फक्त पंजाबमध्ये काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षासोबत हातमिळवणी करुनही काँग्रेसला मोठा दणका बसला. त्यानंतर सोशल मीडियावरही काँग्रेसला टीकेचा सामना करावा लागला.

First Published:

Related Stories

'एबीपी माझा'ला मान्यवरांच्या शुभेच्छा !
'एबीपी माझा'ला मान्यवरांच्या शुभेच्छा !

मुंबई: प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या तुमच्या लाडक्या

कल्याणच्या नेवाळी गावात तणाव, संरक्षण राज्यमंत्र्यांची बैठक
कल्याणच्या नेवाळी गावात तणाव, संरक्षण राज्यमंत्र्यांची बैठक

कल्याण : कल्याणमध्ये नेवाळी विमानतळासाठी जमीन अधिग्रहणाविरोधात

अमिताभ यांनी GSTचा प्रचार करु नये: संजय निरुपम
अमिताभ यांनी GSTचा प्रचार करु नये: संजय निरुपम

मुंबई: आजपासून बरोबर आठ दिवसांनी प्रत्येकाचं बजेट नक्कीच बदलणार

राष्ट्रपती निवडणूक : विरोधकांमध्ये फूट, काँग्रेसच्या नेतृत्वात 17 पक्षांची बैठक
राष्ट्रपती निवडणूक : विरोधकांमध्ये फूट, काँग्रेसच्या नेतृत्वात 17...

नवी दिल्ली : राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या

पुलवामामध्ये तीन दहशतवादी ठार, लष्कराचा एक जवान जखमी
पुलवामामध्ये तीन दहशतवादी ठार, लष्कराचा एक जवान जखमी

जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामानं सुरक्षा दलांनी तीन

विरोधकांचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार आज निश्चित होणार?
विरोधकांचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार आज निश्चित होणार?

नवी दिल्ली : विरोधकांचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार कोण असणार हे आज

टाटा समूह तोट्यातील एअर इंडियाला विकत घेण्याच्या तयारीत
टाटा समूह तोट्यातील एअर इंडियाला विकत घेण्याच्या तयारीत

नवी दिल्ली : एअर इंडियाला लवकरच अच्छे दिन येण्याची शक्यता आहे. कारण

विवाहबाह्य संबंधांचा संशय, 35 वेळा भोसकून पत्नीची हत्या
विवाहबाह्य संबंधांचा संशय, 35 वेळा भोसकून पत्नीची हत्या

नवी दिल्ली : पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून 43 वर्षीय

राष्ट्रपतीपदासाठी डाव्यांची प्रकाश आंबेडकरांना पसंती
राष्ट्रपतीपदासाठी डाव्यांची प्रकाश आंबेडकरांना पसंती

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून डाव्या पक्षांची पहिली

कर्नाटकातील शेतकऱ्यांचं 8 हजार 165 कोटींचं पीककर्ज माफ
कर्नाटकातील शेतकऱ्यांचं 8 हजार 165 कोटींचं पीककर्ज माफ

बंगळुरु : कर्नाटक सरकारने शेतकऱ्यांना दिलेलं 8 हजार 165 कोटींचं