काश्मिरी तरुणांच्या सुरेक्षेसाठी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांना राजनाथ सिंह यांचे आदेश

By: | Last Updated: > Friday, 21 April 2017 9:16 PM
rajnath singh says all states eensure safety of kashmiris

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये काश्मिरी नागरिकांच्या विरोधात काही दिवसांपूर्वी बॅनर लावण्यात आला होता. तर राजस्थानमध्ये काश्मीरी विद्यार्थ्यांना मारहाणी झाल्याची घटना घडली होती. या घटनांवर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी चिंता व्यक्त केली आहे. या दोन्ही प्रकरणांची गंभीर दखल घेऊन, गृहमंत्र्यांनी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांनी आपापल्या राज्यात वसलेल्या काश्मिरी नागरिकांची सुरक्षा निश्चित करावी, अशा सूचना दिल्या आहेत.

गृहमंत्री म्हणाले की, ”काही ठिकाणी काश्मिरी नागरिकांशी गैरवर्तनाच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे देशातल्या सर्व मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्यातील काश्मिरी नागरिकांची सुरक्षा निश्चित करावी. तसेच सर्व देशवासियांनीही काश्मिरी तरुणांना आपल्या कुटुंबातला घटक समजूनच, त्याच्यांशी योग्य वर्तन करावे.”

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये काही बॅनर लागले होते. या बॅनरमधून काश्मिरी नागरिकांवर बहिष्कार टाकण्याचे, तसेच काश्मीरी नागरिकांनीही आपल्या राज्यात परत जावं असं सांगण्यात येत होतं. यानंतर मेरठ पोलिसांनी तत्काळ हे बॅनर काढून टाकले होते. तसेच याप्रकरणी हिंदू संघटना नवनिर्माण सेनेचे नेते अमीर जानी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, यानंतर जानी यांनी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं सांगत, काश्मिरी तरुणांनी आपल्या राज्यात परत जाण्याचा सांगितले आहे. अन्यथा 30 एप्रिलपासून त्यांच्याविरोधात हल्लाबोल मोहीम राबवली जाईल, अशी धमकी दिला आहे.

India News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:rajnath singh says all states eensure safety of kashmiris
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

गोव्यात उद्या पोटनिवडणूक, पर्रिकरांसोबत राणेंचीही प्रतिष्ठा पणाला
गोव्यात उद्या पोटनिवडणूक, पर्रिकरांसोबत राणेंचीही प्रतिष्ठा...

पणजी (गोवा) :  पणजी व वाळपई पोटनिवडणुकीसाठीचा प्रचार सोमवारी

मोदी म्हणाले, निर्णय ऐतिहासिक, अमित शाह म्हणतात नव्या युगाची सुरुवात
मोदी म्हणाले, निर्णय ऐतिहासिक, अमित शाह म्हणतात नव्या युगाची...

नवी दिल्ली :  संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या तिहेरी तलाक प्रकरणी आज

तिहेरी तलाकविरोधात तातडीने कायदा करु: मेनका गांधी
तिहेरी तलाकविरोधात तातडीने कायदा करु: मेनका गांधी

नवी दिल्ली: संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या तिहेरी तलाकप्रकरणी आज

Triple Talaq : 3 विरुद्ध 2 ने तलाकवर मात, कोर्ट रुम 1 मध्ये नेमकं काय घडलं?
Triple Talaq : 3 विरुद्ध 2 ने तलाकवर मात, कोर्ट रुम 1 मध्ये नेमकं काय घडलं?

नवी दिल्ली :  संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या तिहेरी तलाक प्रकरणी आज

तिहेरी तलाक : मुस्लीम महिलांचा आवाज...शायरा बानो
तिहेरी तलाक : मुस्लीम महिलांचा आवाज...शायरा बानो

मुंबई : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या तिहेरी तलाकप्रकरणी आज

Triple Talaq : 5 पाईंटमध्ये समजून घ्या सुप्रीम कोर्टाचा निकाल
Triple Talaq : 5 पाईंटमध्ये समजून घ्या सुप्रीम कोर्टाचा निकाल

नवी दिल्ली :  संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या तिहेरी तलाकप्रकरणी आज

तिहेरी तलाकवर आजपासून बंदी: सुप्रीम कोर्ट
तिहेरी तलाकवर आजपासून बंदी: सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली :  संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या तिहेरी तलाकप्रकरणी आज

‘तिहेरी तलाक’ सुनावणीत आतापर्यंत नेमकं काय-काय झालं?
‘तिहेरी तलाक’ सुनावणीत आतापर्यंत नेमकं काय-काय झालं?

नवी दिल्ली : तिहेरी तलाक प्रकरणी आज सुप्रीम कोर्ट अंतिम निकाल देणार

देशभरातील बँकांचा खासगीकरणाविरोधात एकदिवसीय संप
देशभरातील बँकांचा खासगीकरणाविरोधात एकदिवसीय संप

मुंबई : देशभरातील बँका आज बंद राहणार आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील

अमित शाहांचा तामिळनाडू दौरा रद्द, केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल?
अमित शाहांचा तामिळनाडू दौरा रद्द, केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच...

चेन्नई/नवी दिल्ली : भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी त्यांचा तीन दिवसीय