सर्व किमतीची नाणी स्वीकारा, RBI चे बँकांना निर्देश

कोणत्याही किमतीची नाणी डिपॉझिट किंवा एक्स्चेंज करावीत, अशा सूचना सर्व बँकांनी तात्काळ आपापल्या शाखांना द्याव्यात, असे निर्देश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत.

सर्व किमतीची नाणी स्वीकारा, RBI चे बँकांना निर्देश

मुंबई : कुठल्याही रकमेचं नाणं ग्राहकांकडून घेण्यास बँक नकार देऊ शकत नाही. आदेशाचं गैरपालन झाल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केलं.

कोणत्याही बँकेची शाखा कमी किमतीची नाणी किंवा नोटा नाकारु शकत नाही, अशा सूचना दिलेल्या आहेत. तरी विविध बँकांच्या शाखांनी अल्प किमतीची नाणी किंवा नोटा नाकरल्याच्या तक्रारी येत आहेत, असं आरबीआयने सांगितलं.

नाणी डिपॉझिट किंवा एक्स्चेंज करण्यास बँकांनी नकार दिल्यास दुकानदार किंवा छोटे व्यापारीही ग्राहकांकडून नाणी घेणार नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांची गैरसोय होईल, असं आरबीआयने स्पष्ट केलं.

'कोणत्याही किमतीची नाणी डिपॉझिट किंवा एक्स्चेंज करावीत, अशा सूचना सर्व बँकांनी तात्काळ आपापल्या शाखांना द्याव्यात' असे निर्देश रिझर्व्ह बँकेने दिले. एक आणि दोन रुपयांची नाणी वजनावर घ्यावीत, असी सल्लाही आरबीआयने दिला.

पॉलिथिन सॅशेमध्ये 100 नाण्यांचा जुडगा दिल्यास कॅशिअर आणि ग्राहक अशा दोघांनाही सोयीचं ठरेल, असंही आरबीआय म्हणालं.   बँकांच्या काऊंटरवर पॉलिथिन सॅशे ग्राहकांना उपलब्ध करुन द्यावीत आणि त्यासंबंधी सूचना बँकेच्या आत आणि बाहेर लावाव्यात, असं आरबीआयने सुचवलं.

आदेशांचं गैरपालन करणं हा आरबीआयने जारी केलेल्या सूचनांचं उल्लंघन मानलं जाईल. संबंधित बँक शाखांवर दंडात्मक कारवाई  करण्यात येईल, असंही आरबीआयने स्पष्ट केलं.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: RBI asks banks to accept coins of all denominations from public latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV