आधी चौथ्या, मग सहाव्या रांगेत, राहुल गांधींच्या आसनव्यवस्थेवरुन काँग्रेसची टीका

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आसनव्यवस्थेची चर्चा होती.

आधी चौथ्या, मग सहाव्या रांगेत, राहुल गांधींच्या आसनव्यवस्थेवरुन काँग्रेसची टीका

नवी दिल्ली: देशभरात आज 69 व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आहे. राजपथावर देशाचं सामर्थ्य जगाने पाहिलं.

यावेळी सर्व राजकीय नेते उपस्थित होते. पण यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आसनव्यवस्थेची चर्चा होती.

राहुल गांधी चौथ्या रांगेत काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्या बाजूला बसले होते. तर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी त्यांच्या पुढे दोन रांगेत बसल्या होत्या. तर भाजप अध्यक्ष अमित शाह पहिल्या रांगेत होते.

या सोहळ्यानंतर काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी ट्वीट करुन मोदी सरकारवर निशाणा साधला. मोदी सरकारने जाणीवपूर्वक राहुल गांधींना सहाव्या रांगेत बसवल्याचा आरोप सुरजेवाला यांनी केला.राजपथावरील या सोहळ्याला आशियाई देशाचे दहा अध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या रांगेत बसले होते. तर गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्री दुसऱ्या रांगेत होते.

राजपथावरील आसनव्यवस्था संरक्षण मंत्रालयाकडून केली जाते. राहुल गांधींना चौथ्या रांगेत जागा दिल्याचं वृत्त गुरुवारी आलं होतं.

सरकार खालच्या पताळीचं राजकारण करतंय, पण कोणतीही जागा दिली, तरी राहुल गांधी प्रजासत्ताक सोहळ्याला हजेरी लावणारच, असं काँग्रेसने म्हटलं होतं.

स्वातंत्र्यापासून काँग्रेस अध्यक्षांना पहिल्या रांगेत जागा दिली जाते. सोनिया गांधींनाही पहिल्याच रांगेत जागा दिली जात असे.

2014 मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर भाजप अध्यक्ष अमित शाहांनाही पहिल्या रांगेत जागा दिली जाते.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: republic day 2018: rahul gandhi in 6th row, congress target BJP
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV