रिचर्ड थेलर यांच्याकडून नोटाबंदीचं आधी समर्थन, पण...

रिचर्ड थेलर यांनी गेल्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीच्या निर्णयाची घोषणा केल्यानंतर त्याचं सर्वात आधी समर्थन केलं होतं. पण नंतर त्यावरुन तीव्र नाराजीही व्यक्त केली होती.

रिचर्ड थेलर यांच्याकडून नोटाबंदीचं आधी समर्थन, पण...

नवी दिल्ली : रिचर्ड थेलर यांना यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल जाहीर झाल्यानंतर, त्यांचं सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे. पण थेलर यांनी गेल्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीच्या निर्णयाची घोषणा केल्यानंतर त्याचं सर्वात आधी समर्थन केलं होतं. पण नंतर त्यावरुन तीव्र नाराजीही व्यक्त केली होती.

सध्या देशभरातून नोटाबंदी आणि जीएसटीवरुन केंद्र सरकारवर टीका होत आहे. त्यावर मोदी समर्थकांकडून अर्थशास्त्रातील नोबेल विजेत्या रिचर्ड थेलर यांनी गेल्यावर्षी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर, त्याचं समर्थन केलेला ट्वीट सोशल मीडियातून व्हायरल होत आहे.रिचर्ड थेलर यांनी आपल्या ट्वीटमधून नोटाबंदी आणि कॅशलेस अर्थव्यवस्थेचं जोरदार समर्थन केलं होतं. त्या ट्वीटमध्ये थेलर म्हणाले होते की,"(कॅशलेस अर्थव्यवस्थ) हे असं धोरण आहे, ज्याचं मी पूर्णपणे समर्थन करतो. कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे देशाचे हे पहिले पाऊल असून, यामुळे भ्रष्टाचार कमी करण्यासाठी नक्कीच सकारात्मक दिशा मिळेल."

पण मोदी सरकारने 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा चलनातून रद्द करुन, 2000 च्या नव्या नोटा चलनात आणल्याचं त्यांना ज्यावेळी समजलं, त्यावेळी त्यांनीच या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती.

नोबेल पुरस्कारच्या स्पर्धेत रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचंही नाव चर्चेत होतं. पण त्यांनी कधीही नोटाबंदीचं समर्थन केलेलं नाही.

दरम्यान, थेलर यांच्या नावे व्हायरल होणारं ट्विटर हॅण्डल अधिकृत असल्याची माहिती मिळत नाही. पण नोबेल पुरस्कार जाहीर झाल्यानंतर, अधिकृत फीडमध्ये त्याच हॅण्डलला टॅग करण्यात आलं आहे. त्यामुळे त्याला अधिकृत मानता येऊ शकतं.

संबंधित बातम्या

रिचर्ड थेलर यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार

अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कारासाठी रघुराम राजन यांच्या नावाची चर्चा

नोटाबंदीनंतर लगेचच जीसएटी का? यशवंत सिन्हांचे हल्ले सुरुच

विकास वेडा झाला आहे, ‘सामना’तून टीकास्त्र यशवंत सिन्हांना पाठिंबा

नोटाबंदीवरुन यशवंत सिन्हांचा घणाघात, आता पुत्र जयंत सिन्हांचं उत्तर

नोटाबंदीवरुन यशवंत सिन्हांचा घणाघात, आता पुत्र जयंत सिन्हांचं उत्तर

विकासाला काय झालं?, राहुल गांधींकडून मोदींच्या विकास मॉडेलची खिल्ली

मंदीत नोटाबंदी म्हणजे आगीत तेल : यशवंत सिन्हा

भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढत असल्याचं जगाने मान्य केलंय : राजनाथ सिंह

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV