राजीनामा द्या, अन्यथा हकालपट्टी, तेजस्वी यादवांना स्पष्ट आदेश

आरजेडी आणि जेडीयू यांच्यातली दरी गेल्या काही दिवसांपासून वाढताना दिसून येत आहे. त्यानंतर आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचा राजीनामा मागितला आहे.

राजीनामा द्या, अन्यथा हकालपट्टी, तेजस्वी यादवांना स्पष्ट आदेश

पाटणा : आरजेडी आणि जेडीयू यांच्यातली दरी गेल्या काही दिवसांपासून वाढताना दिसून येत आहे. त्यानंतर आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचा राजीनामा मागितला आहे.

तेजस्वी यादव यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांना बडतर्फ करण्याचा इशाराही नितीश कुमारांनी दिला आहे. तशी माहिती सत्तेतील मित्रपक्ष काँग्रेसलाही देण्यात आली आहे.

बिहारमध्ये जेडीयू, आरजेडी आणि काँग्रेसची युती आहे. गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव यांचं बोलणंही बंद झालं आहे. त्याचा भाग म्हणून बिहारमध्ये झालेल्या एका सरकारी कार्यक्रमाला नितीश कुमारांची हजेरी होती, पण उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी दांडी मारली.

लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव आणि इतर यादव कुटुंबीयांच्या बेहिशेबी मालमत्तेवर सीबीआयने छापेमारी केली. त्यानंतर जदयूकडून तेजस्वी यादव यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV