अयोध्याप्रश्नी सुप्रीम कोर्टाचा निर्णय रा.स्व. संघाला मान्य : मोहन भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अयोध्याप्रश्नी सुप्रीम कोर्टाचा निर्णय मान्य असल्याचं स्पष्ट केलं आहे.

By: | Last Updated: > Wednesday, 13 September 2017 12:25 PM
rss cheif mohan bhagwat RSS bound by supreme court order on ayodhya issue

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अयोध्याप्रश्नी सुप्रीम कोर्टाचा निर्णय मान्य असल्याचं स्पष्ट केलं आहे. मंगळवारी त्यांनी 50 देशांच्या राजदूत आणि राजकीय व्यक्तींची भेट घेतली. त्यानंतर पत्रकांराशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मोहन भागवत यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत राम मंदिराचा प्रश्न निकाली निघेल का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना, भागवत म्हणाले की, “सध्या हे प्रकरण सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ठ आहे. सुप्रीम कोर्टाचा यावर जोकाही निर्णय येईल, तो आम्हाला मान्य असेल.”

संघ आणि भाजपच्या संबंधांबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना मोहन भागवत म्हणाले की, “संघ भाजपला नियंत्रित करत नाही. किंवा भाजप संघाला नियंत्रित करतो असंही नाही. आम्ही स्वतंत्र राहून एका स्वयंसेवकाप्रमाणे त्यांच्याशी संपर्कात असतो. आणि त्यामाध्यमातूनच दोघांमध्ये विचारांची देवाण-घेवाण होते.”

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी मोहन भागवत यांनी आपले पंतप्रधान मोदींशी चांगले संबंध असल्याचं सांगितलं. अनेक विषयांवर पंतप्रधानांशी त्यांची नेहमी चर्चा होत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं.

दरम्यान, एका थिंकटँकच्या वतीनं आयोजित परिषदेत बोलताना, मोहन भागवात यांनी संघ इंटरनेटवरील ट्रोलिंगचं समर्थन करत नसल्याचं स्पष्ट केलं होतं. तसेच कसल्याही प्रकारचा भेदाभेद न बाळगता संघ देशाच्या अखंडत्वासाठी काम करत असल्याचं सांगितलं होतं.

India News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:rss cheif mohan bhagwat RSS bound by supreme court order on ayodhya issue
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

संघाकडे एके-47 सारखी शस्त्रं येतात कुठून? : प्रकाश आंबेडकर
संघाकडे एके-47 सारखी शस्त्रं येतात कुठून? : प्रकाश आंबेडकर

नवी दिल्ली  : ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कुठल्याच कायद्यांतर्गत

बर्थडे स्पेशल: मनमोहन सिंह यांचे 5 निर्णय देश विसरु शकणार नाही!
बर्थडे स्पेशल: मनमोहन सिंह यांचे 5 निर्णय देश विसरु शकणार नाही!

नवी दिल्ली: भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचा आज वाढदिवस.

राणे-शाहांच्या बैठकीत नेमकं काय काय झालं?
राणे-शाहांच्या बैठकीत नेमकं काय काय झालं?

नवी दिल्ली : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या दिवशीच

तासाभराने सेल्फी पाहताना समजलं मित्र पाण्यात बुडाला!
तासाभराने सेल्फी पाहताना समजलं मित्र पाण्यात बुडाला!

बंगळुरु : सेल्फीचा नाद एखाद्याच्या जीवावर बेतल्याची अनेक उदाहरणं

हनीप्रीत दिल्लीतच लपल्याची माहिती, अटकपूर्व जामिनासाठी अर्ज
हनीप्रीत दिल्लीतच लपल्याची माहिती, अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

नवी दिल्ली : बाबा राम रहीमची निकटवर्तीय मानली जाणारी हनीप्रीत

पंतप्रधान मोदींकडून आदित्य ठाकरेंचं जाहीर कौतुक
पंतप्रधान मोदींकडून आदित्य ठाकरेंचं जाहीर कौतुक

मुंबई: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवासेना प्रमुख आदित्य

'पतंजली'च्या आचार्य बालकृष्णांची संपत्ती 70 हजार कोटी!
'पतंजली'च्या आचार्य बालकृष्णांची संपत्ती 70 हजार कोटी!

मुंबई : बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली आयुर्वेद’चे प्रमुख आचार्य

SBI खातेधारकांच्या मिनिमम बॅलन्सच्या मर्यादा शिथिल
SBI खातेधारकांच्या मिनिमम बॅलन्सच्या मर्यादा शिथिल

मुंबई : ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’नं मिनिमम बॅलन्स ठेवण्याच्या अटी

यापुढे घुसखोरी केल्यास जमिनीत गाडू, भारतीय लष्करप्रमुखांचा दहशतवाद्यांना इशारा
यापुढे घुसखोरी केल्यास जमिनीत गाडू, भारतीय लष्करप्रमुखांचा...

नवी दिल्ली : सीमा ओलांडून भारतात आलात, तर जमिनीत गाडू, असा सज्जड दम

अमित शाहांची राहुल गांधींवर जोरदार टीका
अमित शाहांची राहुल गांधींवर जोरदार टीका

मुंबई : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत बोलताना भाजप