राष्ट्रोदय संमेलनाच्या माध्यमातून संघाचं मेरठमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन

राष्ट्रोदय संमेलनाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं उत्तरप्रदेशातील मेरठमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन सुरु आहे. देशभरातून जवळपास तीन लाख स्वयंसेवक या संमेलनाला उपस्थित असल्याचा दावा संघाकडून करण्यात आला आहे.

राष्ट्रोदय संमेलनाच्या माध्यमातून संघाचं मेरठमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन

लखनऊ : राष्ट्रोदय संमेलनाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं उत्तरप्रदेशातील मेरठमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन सुरु आहे. देशभरातून जवळपास तीन लाख स्वयंसेवक या संमेलनाला उपस्थित असल्याचा दावा संघाकडून करण्यात आला आहे.

राष्ट्रोदय संम्मेलनात अनेक भाजपचे अनेक नेते आणि मंत्री संघाच्या गणवेशात सहभागी झाले आहेत. सरसंघचालक मोहन भागवत यांचं काही वेळापूर्वी संम्मेलनस्थळावर आगमन झालं असून, भागवत स्वयंसेवकांना काय मार्गदर्शन करतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

काही दिवसांपूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय लष्कर आणि स्वयंसेवकांबद्दल केलेल्या वक्यव्यावरुन वाद निर्माण झाला होता. नव्या पिढीपर्यंत पोहचण्यासाठी या संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विस्तार करणे आणि अधिकाधिक लोकांना आकर्षित करण्याचा संघाचा प्रयत्न आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: RSS Set to Massive Show of a Strength in Meerut uttar pradesh latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV