‘विहिंप’च्या अध्यक्षपदी विष्णू सदाशिव कोकजे यांची वर्णी

विश्व हिंदू परिषदेचे प्रविण तोगडिया यांना जोरदार झटका बसला आहे. कारण आज पार पडलेल्या निवडणुकीत विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदी विष्णू सदाशिव कोकजे विजयी झाले आहेत.

‘विहिंप’च्या अध्यक्षपदी विष्णू सदाशिव कोकजे यांची वर्णी

नवी दिल्ली विश्व हिंदू परिषदेचे प्रविण तोगडिया यांना जोरदार झटका बसला आहे. कारण आज पार पडलेल्या निवडणुकीत विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदी विष्णू सदाशिव कोकजे विजयी झाले आहेत.

विष्णू सदाशिव कोकजे हे हिमाचल प्रदेशचे माजी राज्यपाल आहेत.

तब्बल 52 वर्षांनी झालेल्या निवडणुकीत आज कोकजे 131 मतांनी निवडून आले आहेत. या निवडणुकीत एकूण 273 प्रतिनिधींपैकी 192 प्रतिनिधींनी मतदान केलं. या निवडणुकीत गेल्या अनेक वर्षांपासून विहिंपचं अध्यक्षपद भूषवणाऱ्या प्रविण तोगडिया यांच्या समर्थकाचा पराभव झाला आहे.

गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांमुळे भाजप आणि तोगडिया यांच्यातील संबंध दुरावल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यामुळे तोगडिया यांना पदावरुन हटवण्यासाठीच ही निवडणूक झाल्याचं बोललं जात आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: vishnu sadashiv kokaje elected as new chairman of vishwa hindu parishad latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV