DRS मुळं रिद्धिमान साहाला जीवदान, ऑस्ट्रेलियन संघ नाराज

By: | Last Updated: > Sunday, 19 March 2017 3:40 PM
saha-survives-with-drs-smith-and-cummins-livid

रांची : रांची कसोटीच्या चौथ्या दिवशी भारतानं ऑस्ट्रेलियाला चोख प्रत्युत्तर दिलं. चेतेश्वर पुजारा आणि रिद्धिमान साहाच्या भक्कम खेळींच्या जोरावर टीम इंडियाला ऑस्ट्रेलियावर आघाडी घेण्यात यश आलं. मात्र, रिद्धिमान साहला पंचांनी बाद केल्यानंतर, त्याविरोधात रिद्धिमान साहनं DRS वापरल्यामुळे साहाला जीवदान मिळालं. पण यामुळे ऑस्ट्रेलियनं संघात कमालीची नाराजी पाहायला मिळाली.

वास्तविक, आजच्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर दुसऱ्याच ओव्हरमधील पेट कमिंसनं रिद्धिमानला लागला. पण तो चेंडू रिद्धिमानच्या पॅडला लागल्यानं ऑस्ट्रेलियन संघानं जोरदार अपील केली. यानंतर फिल्ड अंपायर क्रिस जॅफ्नी यांनी साहाला बाद घोषित केलं.

पंचाचा निर्णय चुकीचा असल्याने, साहाने तत्काळ चेतेश्वर पुजाराचा सल्ला घेऊन DRS चा निर्णय घेतला. यावेळी थर्ड अम्पायरने रिप्ले पाहून रिद्धिमान साह बाद नसल्याचं घोषित केलं. यानंतर टीम इंडियानं तंबूत मोठा जल्लोष केला. यावेळी टीम इंडियाचा सलामीवीर मुरली विजने जी प्रतिक्रिया दिली, ती पाहून ऑस्ट्रेलियन संघ कमालीचा नाराज झाला.

डीआरएसमुळं रिद्धिमान साहला जीवदान मिळाल्यानं कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि जलद गती गोलंदाज पेट कमिंस यांच्या चेहऱ्यावर नाराजीच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या. या जीवदानानंतर रिद्धिमान साहानंही खणखणीत शतक झळकावून ऑस्ट्रेलियन संघाला चोख प्रत्युत्तर दिलंय. मात्र ऑकिफच्या चेंडूवर मॅक्सवेलकडे झेल देऊन 117 धावांवर तो बाद झाला.

दरम्यान, भारतीय संघाने 8 गडी बाद 569 धावा ठोकून 118 धावांची आघाडी मिळवली आहे. भारताच्या वतीने सर्वाधिक धावा या चेतेश्वर पुजारानं (202) झळकावल्या. सध्या रविंद्र जडेजा 31 आणि उमेश यादव 6 धावांवर खेळत आहे.

First Published:

Related Stories

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 28/06/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 28/06/2017

युरोपमध्ये पुन्हा सायबर हल्ला, बँका, कंपन्यांसह ब्रिटीश

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानींचा पगार किती?
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानींचा पगार किती?

मुंबई : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा पगार

महिलांनी रेपच्या बदल्यात जवानांची गुप्तांगं कापली, आझम बरळले
महिलांनी रेपच्या बदल्यात जवानांची गुप्तांगं कापली, आझम बरळले

लखनऊ: वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या समाजवादी पक्षाचे

पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी उरले फक्त दोन दिवस!
पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी उरले फक्त दोन दिवस!

नवी दिल्ली : इन्कम टॅक्स रिटर्न भरणाऱ्यांवर आता पॅन कार्ड नंबर आधार

राष्ट्रपती निवडणुकीसाठी यूपीएकडून मीरा कुमार यांचा अर्ज दाखल
राष्ट्रपती निवडणुकीसाठी यूपीएकडून मीरा कुमार यांचा अर्ज दाखल

नवी दिल्ली: राष्ट्रपतीपदासाठीच्या यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार

लेह-लडाखपर्यंत रेल्वेचं जाळं, सर्वात उंचावरील रेल्वेमार्ग ठरणार
लेह-लडाखपर्यंत रेल्वेचं जाळं, सर्वात उंचावरील रेल्वेमार्ग ठरणार

लेह : चीनपासून वाढता धोका पाहता मोदी सरकारने रेल्वेचं जाळं आता

युरोपमध्ये पुन्हा सायबर हल्ला, भारतालाही धोका
युरोपमध्ये पुन्हा सायबर हल्ला, भारतालाही धोका

मुंबई : वॉनाक्रायच्या दहशतीच्या महिन्याभरानंतर नव्या पीटरॅप

पासपोर्टचे रंग बदलले म्हणून रक्ताची नाती मिटत नाहीत : मोदी
पासपोर्टचे रंग बदलले म्हणून रक्ताची नाती मिटत नाहीत : मोदी

हेग : पासपोर्टचे रंग बदलले म्हणून रक्ताची नाती मिटत नाहीत, असे म्हणत

जीएसटीनंतर वीज दर वाढणार नाहीत : पियुष गोयल
जीएसटीनंतर वीज दर वाढणार नाहीत : पियुष गोयल

नवी दिल्ली : जीएसटीनंतर वीज बिल वाढण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.

भारताकडे ग्लोबल इकॉनॉमिक पॉवर, नेदरलँडच्या पंतप्रधानांकडून मोदींचं स्वागत
भारताकडे ग्लोबल इकॉनॉमिक पॉवर, नेदरलँडच्या पंतप्रधानांकडून...

अॅमस्टरडॅम : अमेरिका दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट