मार्कशीटवर सलमान खानचा फोटो, आग्रा विद्यापीठाचा भोंगळ कारभार

आग्रा विद्यापीठाने दिलेल्या एका मार्कशीटनुसार अभिनेता सलमान खानने बीएच्या प्रथम वर्षाची परीक्षा दिली असून त्याला ३५ टक्के गुण मिळाले आहेत.

मार्कशीटवर सलमान खानचा फोटो, आग्रा विद्यापीठाचा भोंगळ कारभार

आग्रा (उत्तरप्रदेश) : उत्तरप्रदेशमधील आग्रा विद्यापीठातील बोगस मार्कशीटचा वाद सुरु असतानाच आता विद्यापीठाचा आणखी एक भोंगळ कारभार समोर आला आहे.

आग्रा विद्यापीठाने दिलेल्या एका मार्कशीटनुसार अभिनेता सलमान खानने बीएच्या प्रथम वर्षाची परीक्षा दिली असून त्याला ३५ टक्के गुण मिळाले आहेत. तर सलमान खानव्यतिरिक्त काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही या विद्यापीठातून परीक्षा दिली असल्याचं मार्कशीटवरून उघड झालं आहे.

मार्कशीटवर सलमान आणि राहुल गांधींचा फोटो छापल्यानं विद्यापीठाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे.  याविषयी अधिक तपास केल्यानंतर लक्षात आलं की विद्यार्थ्यांच्या मार्कशीटच्या छपाईचं काम एका त्रयस्थ कंपनीला देण्यात आलं होतं.

मात्र कंपनीने घातलेल्या घोळामुळे मार्कशीटवर विद्यार्थ्यांच्या फोटोंऐवजी सलमान आणि राहुल गांधींचा फोटो छापण्यात आला आहे. मात्र, आमच्याकडून कोणतीही चूक झालेली नाही असं आग्रा विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकऱ्यांचं म्हणणं आहे.

VIDEO :

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Salman Khan’s photo on Marksheets in Agra Universi
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV