SBI च्या व्याजदरात कपात, होम लोन-कार लोनधारकांना दिलासा

एसबीआयने गृहकर्ज आणि वाहन कर्जावरील व्याजदरात 0.05 टक्क्यांची कपात केली आहे.

SBI च्या व्याजदरात कपात, होम लोन-कार लोनधारकांना दिलासा

मुंबई : घर आणि वाहनकर्ज घेण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानं व्याजदरात 0.05 टक्क्यांनी कपात केली आहे.

एसबीआयने गृहकर्ज आणि वाहन कर्जावरील व्याजदरात 0.05 टक्क्यांची कपात केली आहे. त्यामुळे गृह कर्ज 8.35 टक्क्यांवरुन आता 8.30 टक्के झालं आहे. तर वाहन कर्जाचे व्याजदर हे 8.75 वरुन घट होऊन 8.70 टक्के इतके झाले आहेत.

एसबीआयच्या गृहकर्जाचे व्याज दर हे सर्वात कमी असल्याचं एसबीआयने या कपातीनंतर जाहीर केलं आहे. नवीन व्याजदर 1 नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत.

एसबीआयने व्याज दरात केलेल्या कपातीनंतर इतर बँकाही व्याज कपातीची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे होमलोन आणि कार लोन घेणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळण्याची चिन्हं आहेत.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: SBI cuts home loan, car loan rates by 5 basis points latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV