तिहेरी तलाकचा निर्णय सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला

तिहेरी तलाकचा निर्णय सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला

नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टात तिहेरी तलाकबाबतची सुनावणी आज पूर्ण झाली. 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर 6 दिवस युक्तीवाद चालला. मात्र  सुप्रीम कोर्टाने या खटल्याचा निकाल राखून ठेवला आहे.

केंद्र सरकारकडून तिहेरी तलाकविरोधात महाधिवक्ता मुकूल रोहतगी यांनी बाजू मांडली. तर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या वतीनं ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला.

तिहेरी तलाक इस्लामचा मूलभूत भाग नाही, केंद्राचा सुप्रीम कोर्टात दावा

गेल्या गुरुवारपासून सुप्रीम कोर्टात तिहेरी तलाकवर सुनावणी सुरु आहे.


 

केंद्र सरकारचं म्हणणं

तिहेरी तलाक हा इस्लामचा मूलभूत आणि अविभाज्य भाग नाही. त्यामुळे तिहेरी तलाक संपुष्टात आणल्यास इस्लामचा पाया डगमगेल, असं म्हणणं निरर्थक आहे, असं नमूद करत केंद्र सरकारनं पुन्हा एकदा तिहेरी तलाक प्रथा संपुष्टात आणण्याची  मागणी केली.

या सुनावणीच्या कालच्या पाचव्या दिवशी महाधिवक्ता मुकूल रोहतगी यांनी सरकारची बाजू भक्कमपणे मांडली. मुकुल रोहतगी यांनी हिंदू धर्मातील सती, देवदासी यांसारख्या अनिष्ठ प्रथा कायदा करून संपुष्टात आणण्यात आल्याचा दाखला दिला.

विशेष म्हणजे, या सुनावणीवेळी न्यायालयाने महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांना केंद्र सरकार यासाठी कायदा का करत नाही? असा प्रश्न केला. त्यावर मुकुल रोहतगी यांनी आम्ही यासाठी तयार असल्याचा पुनरुच्चार केला.

सोमवारी या प्रकरणाच्या सुनावणीवेळी महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी सुप्रीम कोर्ट जर ही प्रथा संपुष्टात आणणार असेल, तर त्यावर केंद्र सरकार कायदा करेल, असं स्पष्ट केलं होतं. तसेच या सुनावणीत घटनेच्या कलम 14, 15 (समानतेचा कायदा) चा विचार केला पाहजे, असं मतही न्यायालया समोर मांडलं होतं.

कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद

मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी कोर्टानं कोणत्याही धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये, अशी भूमिका कपिल सिब्बल यांनी मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डच्या वतीनं मांडली. तसेच यावेळी सिब्बल यांनी रामजन्म आणि गोरक्षेचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र कोर्टानं राजनैतिक मुद्यांवर भाष्य न करण्याचं आवाहन करत, फक्त तिहेरी तलाकवर युक्तीवाद करण्याच्या सूचना दिल्या.

”तिहेरी तलाकची परंपरा 1400 वर्ष जुनी आहे. तसेच सुन्नी मुसलमानांचा एक मोठा वर्ग याचं पालन करतो. त्यामुळे 16 कोटी जनतेशी संबंधित मुद्द्यावर न्यायालयाने निर्णय देऊ नये.” असं कपिल सिब्बल म्हणाले होते.

संबंधित बातम्या

तिहेरी तलाक घटनाबाह्य कसा? कपिल सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

… तर तिहेरी तलाकसाठी केंद्र सरकार कायदा करेल!

BLOG: ‘तोंडी तलाक’ला आता न्यायाची प्रतिक्षा

‘तिहेरी तलाक’ची प्रथा सर्वात वाईट, सुप्रीम कोर्टाचं परखड मत

ट्रिपल तलाकबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी, 6 दिवस युक्तीवाद चालणार

कोर्टातच बायकोला ‘ट्रिपल तलाक’ देऊन पती फरार!

‘पतीनं मनातच तलाक म्हटलं आणि मला सोडलं’, पुण्यातील महिलेची व्यथा

तीन तलाक वैध की अवैध?, सुप्रीम कोर्टात सुनावणीला वेग


चहाचा कप हातातून निसटला, पती म्हणाला तलाक…तलाक…तलाक…


मुस्लिम लॉ बोर्ड घटनेपेक्षा मोठं नाही, तोंडी तलाक क्रूरपणा: अलाहाबाद हायकोर्ट

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV