RO पाण्यानेच उज्जैनच्या शिवलिंगावर अभिषेक करा : सुप्रीम कोर्ट

उज्जैनच्या महाकाल मंदिरातील शिवलिंगावरील फक्त अर्धा लिटर आरओ पाण्याने अभिषेक करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत.

RO पाण्यानेच उज्जैनच्या शिवलिंगावर अभिषेक करा : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक उज्जैनच्या महाकाल मंदिरातील शिवलिंगावरील फक्त अर्धा लिटर आरओ पाण्याने अभिषेक करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. तसेच अभिषेकासाठी वापरलं जाणारं पाणी, दूध आणि पंचामृतानं यांचं प्रमाणही कमी करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

शिवलिंगाची झीज होऊ नये यासाठी कोर्टानं एका समितीची स्थापना केली होती. गर्भगृहातील भाविकांची संख्या कमी करणं तसेच पाणी, दूध, पंचामृत याने अभिषेक करणाऱ्यावरही बंधन घालण्यात यावी अशा शिफारसी या समितीनं केल्या होत्या.

दरम्यान, आज समितीनं सुचवलेल्या शिफारशीवर मंदिर प्रशासनाला उत्तर द्यायचं होतं.

मंदिर प्रशासनाचा प्रस्ताव :

  • मंदिरात प्रत्येक भाविकाला फक्त अर्धा लिटर पाण्यानं अभिषेक करता येईल.  • शिवलिंगावर फक्त आरओ पाण्यानं अभिषेक करता येईल.   • प्रत्येक भाविकाला सवा लीटर पंचामृतानं अभिषेक करता येईल.  • भस्म आरतीवेळी शिवलिंगला सुती कपड्यानं झाकलं जाईल.  • शिवलिंगावर साखरेची पावडर लावण्यावर बंदी  • गर्भगृह कोरडं ठेऊ तसेच शिवलिंगापर्यंत हवा येण्याची व्यवस्था करु.


 

न्यायमूर्ती  अरुण मिश्रा आणि एल नागेश्वर राव यांच्या खंडपीठानं मंदिर प्रशासनाच्या या प्रस्तावावर समाधान व्यक्त केलं आहे. 'आम्ही मंदिर प्रशासनाच्या प्रस्तावाची प्रशंसा करतो. अनेक वर्षानंतर काही चांगली पावलं उचलली गेली या गोष्टीचा आनंद आहे.' असं मत यावेळी कोर्टानं नोंदवलं.

दरम्यान, याचिकाकर्त्या सारिका गुरु या प्रस्तावावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे कोर्टानं त्यांची बाजू आणि सूचना मांडण्यासाठी 15 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. याची पुढील सुनावणी 30 नोव्हेंबरला होणार आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: SC orders only half litter RO water to used in mahakaleshwar temple in ujjain latets update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV