राम रहीमच्या डेऱ्यातील सर्च ऑपरेशन पूर्ण, पाहा काय काय सापडलं?

सिरसामधील रेल्वे आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने कर्फ्यूही हटवण्यात येणार आहे.

राम रहीमच्या डेऱ्यातील सर्च ऑपरेशन पूर्ण, पाहा काय काय सापडलं?

सिरसा (हरियाणा) : सिरसामधील राम रहीमच्या डेऱ्यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेलं सर्च ऑपरेशन पूर्ण झालं आहे. तीन दिवसांच्या सर्च ऑपरेशनमध्ये अनेक धक्कादायक गोष्टी सापडल्या आहेत.

राम रहीमच्या डेऱ्यात काय काय सापडलं?

84 बॉक्स स्फोटकं, एक ट्रॉली लाठ्या, आयफोन, आयपॅड, चेक बुक, एक लॅपटॉप जप्त करण्यात आले. याचसोबत सर्च ऑपरेशनदरम्यान डेऱ्यात एक गुप्त रस्ताही आढळला, जो गर्ल हॉस्टेल आणि साध्वींच्या निवासस्थानाकडे जातो.

त्याचसोबत, एके-47 रायफलच्या रिकाम्या मॅगझिन, कम्प्युटर हार्ड डिस्कही सापडली. डेऱ्यात मोठ्या प्रमाणात फटाके बनवण्याचं साहित्य सापडलं असून, जवळपास 84 बॉक्स स्फोटकं जप्त करण्यात आली. तपासादरम्यान जवळपास 3 हजार महागडे कपडे आणि 1500 महागडे बूटही सापडले.

दरम्यान, कालपासून सिरसामधील रेल्वे आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने कर्फ्यूही हटवण्यात येणार आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV