'पत्नीचा राग शांत करणं, आणि मैदानात विराटला डिवचणं धोक्याचं'

By: | Last Updated: > Sunday, 18 June 2017 11:10 AM
sehwag gives stern warning to Pakistan on todays final match

नवी दिल्ली :  आज लंडनमधील ओव्हल मैदानात भारत विरुद्ध पाकिस्तानदरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीतला अंतिम सामना होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघाची जोरदार तयारी सुरु आहे. पण मैदानाबाहेरही भारत-पाकिस्तानचे दोन माजी दिग्गज क्रिकेटपटूंमध्येही वाकयुद्ध रंगलं आहे. एबीपी न्यूजच्या विशेष कार्यक्रमात टीम इंडियाचा माजी तडाखेबाज फलंदाज विरेंद्र सेहवाग आणि पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरमध्ये हा सामना रंगला.

या चर्चेत शोएबच्या बाऊन्सरला वीराटने चोख प्रत्युत्तर दिलं. यावेळी वीरुनं विराट कोहलीला मैदानात डिवचण्याचा मुद्दा चर्चेत आला. त्यावर सेहवागने पाकिस्तानी संघाला धोक्याचा इशारा दिला. वीरु म्हणाला की, “पत्नीचा राग शांत करणं आणि मैदानात विराटला डिवचण्यात सर्वात मोठा धोका आहे.” वीरुच्या या वक्तव्यावर शोएबला काहीच बोलता आलं नाही. त्याने स्मित हास्य करुन, यावर उत्तर देणं टाळलं.

विशेष म्हणजे, यावेळी वीरुने शोएबला भारतीय संघाने आजपर्यंत कोणत्याही मोठ्या टूर्नामेंटमध्ये पाकिस्तानकडून पराभवाला सामोरे जावं लागला नसल्याची आठवण करुन दिली. पण त्यावर पाकिस्तानचा बचावाचा तोकडा प्रयत्न करत शोएबने भारतीय संघापेक्षा पाकिस्तानने एकदिवसीय सामने जास्त जिंकले असल्याचं सांगितलं.

तसेच इतर सामन्याप्रमाणे या सामन्यात पाकिस्तानने भारताल हरवण्याचा विचार म्हणजे, जमीनीवर राहून आकाशातले तारे तोडण्यासारखं असल्याचं सांगितलं.

कर्णधार विराट कोहलीचीही वीरुने यावेळी मुक्तकंठाने स्तुती केली. वीरु म्हणाला की, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने चॅम्पियन्स ट्रॉफीत नेहमीच स्वत:चा दबदबा राखलाय. तसेच पाकिस्तानची कायमच वाट लावली आहे.

दरम्यान, गेल्याकाही दिवसांपासून सेहवाग आपल्या एका ट्वीटवरुनही चर्चेत आहे. वीरुनं हे ट्वीट भारतीय संघाने बांग्लादेशचा दारुण पराभव केल्यानंतर केलं होतं. या ट्वीटमध्ये सेहवाग म्हणतो, “नातवांनी, चांगला प्रयत्न केला. सेमीफायनलपर्यंत पोहोचण्यासाठीचा प्रयत्न चांगला होता. घरातलीच गोष्ट आहे. ‘फादर्स डे’ला मुलासोबत फायनल मॅच आहे. हा विनोद आहे, सिरियस होऊ नका.”

विशेष म्हणजे, तब्बल दहा वर्षानंतर भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ आयसीसी टूर्नामेंटच्या फायनलमध्ये एकमेकांशी भिडणार आहेत. 2007 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पाकिस्तानला आयसीसी टी-20 च्या अंतिम सामन्यात हारवलं होतं. त्यामुळे 2007 चीच पुनरावृत्ती करत भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव करुन चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव करावे, अशी सर्व चाहत्यांची इच्छा आहे.

संपूर्ण कार्यक्रम पाहा

India News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:sehwag gives stern warning to Pakistan on todays final match
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

50 रुपयांची नवी नोट लवकरच चलनात, आरबीआयची घोषणा
50 रुपयांची नवी नोट लवकरच चलनात, आरबीआयची घोषणा

नवी दिल्ली : आरबीआयने 50 रुपयांची नवी नोट चलनात आणण्याची घोषणा केली

व्हायरल सत्य : लाल चौकात महिलेकडून 'भारत माता..'च्या घोषणा?
व्हायरल सत्य : लाल चौकात महिलेकडून 'भारत माता..'च्या घोषणा?

मुंबई : काश्मिरच्या लाल चौकात जेव्हा सन्नाटा होता.. तेव्हा एका

लोकसभा 2019 : भाजपचं मिशन 350, महाराष्ट्रात 28 जागांचं स्वप्न
लोकसभा 2019 : भाजपचं मिशन 350, महाराष्ट्रात 28 जागांचं स्वप्न

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची तयारी सुरु झाली आहे. काल

देशातला प्रत्येक राजकीय पक्ष निवडणुकीत विजयासाठी हापापलेला : निवडणूक आयुक्त
देशातला प्रत्येक राजकीय पक्ष निवडणुकीत विजयासाठी हापापलेला :...

नवी दिल्ली : नुकत्याच गुजरामधील राज्यसभा निवडणुकीत हाय व्होल्टेज

चंदिगढमधील 10 वर्षीय बलात्कार पीडित मुलीने बाळाला जन्म दिला
चंदिगढमधील 10 वर्षीय बलात्कार पीडित मुलीने बाळाला जन्म दिला

चंदिगढ : चंदिगढमधील 10 वर्षीय बलात्कार पीडित मुलीने काल एका बाळाला

भारताच्या ‘तवांग’साठी चीन आसुसलेला, एबीपी माझाचा ग्राऊंड रिपोर्ट
भारताच्या ‘तवांग’साठी चीन आसुसलेला, एबीपी माझाचा ग्राऊंड रिपोर्ट

तवांग  (अरूणाचल प्रदेश) : डोकलाम वादावरुन भारतानं चीनला बरंच नामोहरम

अॅक्सिस बँकेचा धमाका, गृहकर्जाचे 12 हप्ते माफ!
अॅक्सिस बँकेचा धमाका, गृहकर्जाचे 12 हप्ते माफ!

मुंबई: मोबाईल कंपन्यांप्रमाणे बँकिंग क्षेत्रातही मोठी स्पर्धा

शिक्षिकेला भर वर्गात विद्यार्थ्यांसमोर पेटवलं!
शिक्षिकेला भर वर्गात विद्यार्थ्यांसमोर पेटवलं!

बंगळुरु : भर वर्गात शिक्षिकेला विद्यार्थ्यांसमोर पेटवल्याची

उत्तर प्रदेशात 7000 हून जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या पत्राचं वाटप
उत्तर प्रदेशात 7000 हून जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या पत्राचं वाटप

लखनऊ : उत्तर प्रदेशातील 7574 शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या पत्राचं वाटप

2019 साठी भाजपचं ‘मिशन 350 प्लस’, अमित शाहांचा निर्धार
2019 साठी भाजपचं ‘मिशन 350 प्लस’, अमित शाहांचा निर्धार

नवी दिल्ली : आगामी 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच