गंगा स्वच्छतेसाठी इस्रायलची मदत, 7 करारांवर स्वाक्षऱ्या

गंगा स्वच्छतेसाठी इस्रायलची मदत, 7 करारांवर स्वाक्षऱ्या

जेरुसलेम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. मोदींनी आज इस्रायलचे राष्ट्रपती रुवन रिवलिन यांची भेट घेतली. तर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी द्विपक्षीय चर्चाही केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेतन्याहू यांच्या चर्चेनंतर भारत आणि इस्रायल यांच्यात सात महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यामध्ये हवाई संरक्षण, अंतराळ, कृषी आणि संरक्षण क्षेत्रातील करारांचा समावेश आहे. तर गंगा नदीच्या स्वच्छतेसाठीही इस्रायलसोबत करार करण्यात आला आहे.

भारत आणि इस्रायल यांच्यातील 7 करार कोणते?

  • औद्योगिक संशोधन-विकास आणि निधीसंदर्भात सहकार्य

  • जलसंधारण

  • स्टेट वॉटर यूटिलिटी रिफॉर्म

  • कृषी क्षेत्र

  • आण्विक क्षेत्र

  • जीईओ-एलईओ ऑप्टिकल लिंक सहकार्य

  • अंतराळ क्षेत्र

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV