स्पा सेंटरच्या आड सेक्स रॅकेट, दोन परदेशी तरुणींसह 6 जणींना अटक

गोल्फ कोर्स रोड या उच्चभ्रू परिसरात असलेल्या सेंट्रल प्लाझा मॉलमधील AUWA THAI मसाज पार्लरमधून पोलिसांनी दोन परदेशी तरुणींसह सहा मुलींना अटक केली.

स्पा सेंटरच्या आड सेक्स रॅकेट, दोन परदेशी तरुणींसह 6 जणींना अटक

गुरुग्राम : गुरुग्राममध्ये स्पा सेंटरच्या आड मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाला आळा घालण्यासाठी गुरुग्राम पोलिसांनी कंबर कसली आहे. सध्या अनेक ठिकाणी त्यांचे धाडसत्र सुरु आहे.

गुरुग्राममधील सेक्टर 53 मध्ये पोलिसांनी एका मसाज पार्लरवर छापा टाकून सहा जणांना अटक केली. गोल्फ कोर्स रोड या उच्चभ्रू परिसरात असलेल्या सेंट्रल प्लाझा मॉलमधील AUWA THAI मसाज पार्लरमधून पोलिसांनी दोन परदेशी तरुणींसह सहा मुलींना अटक केली. तसेच एका व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे.

स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी नकली ग्राहक स्पा सेंटरमध्ये पाठवून तिथं छापा मारला आणि सेक्स रॅकेट चालवणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या.

अटक केलेल्या सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, या वर्षभरात तब्बल दीड डझनहून अधिक स्पा सेंटरवर पोलिसांनी छापेमारी करुन या गोरखधंदाची पाळमुळं खणून काढण्याचा प्रयत्न केला आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: sex racket busted 6 girls arrested in gurugram latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV