'त्या' दोन आमदारांचं मत रद्द करण्याचं काँग्रेसचं षडयंत्र : शंकरसिंह वाघेला

राज्यसभा निवडणुकीत शंकर सिंह वाघेलांच्या दणक्यानंतरही काँग्रेसचे उमेदवार अहमद पटेल यांचा विजय झाला. पण पटेलांच्या विजयावरुन शंकरसिंह वाघेला यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. 'अहमद पटेलांचा विजय हा मतांमुळे नाही. तर काँग्रेसच्या षडयंत्रामुळे झाल्याचा,' घणाघात शंकरसिंह वाघेलांनी केला.

By: | Last Updated: > Thursday, 10 August 2017 6:04 PM
shanker singh vaghela critisied to congress on ahmed-patel win

गांधीनगर : राज्यसभा निवडणुकीत शंकरसिंह वाघेलांच्या दणक्यानंतरही काँग्रेसचे उमेदवार अहमद पटेल यांचा विजय झाला. पण पटेलांच्या विजयावरुन शंकरसिंह वाघेला यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. ‘अहमद पटेलांचा विजय हा मतांमुळे नाही. तर काँग्रेसच्या षडयंत्रामुळे झाल्याचा,’ घणाघात शंकरसिंह वाघेलांनी केला.

वाघेला यांनी आज पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले की, ”अहमद पटेलांच्या विजयाबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. पण काँग्रेसनं मतं रद्द करण्याचं षडयंत्र सुरुवातीच केलं होतं. वास्तविक, निवडणूक आयोगाने त्या दिवशीचे सर्व आमदारांचे व्हिडीओ पाहण्याची गरज आहे. राघव पटेल यांचं मत रद्द करण्यासंदर्भात काँग्रेसनं सुरुवातीलाच सर्व आखणी केली होती.”

वाघेला पुढे म्हणाले की, ”दोन आमदारांनी भाजपला मत दिलं होतं. जर यामागे षडयंत्र नसलं असतं, तर अहमद पटेलांच्या विजयाचा प्रश्नच उपस्थित झाला नसता. अहमद पटेल चांगले व्यक्ती आहेत. त्यांचा हिशेब दिल्लीवाले करणार होते. पण तरीही ते विजयी झाले, ही चांगली गोष्ट आहे.”

दरम्यान, काँग्रेसच्या दोन बंडखोर आमदरांचं मत रद्द झाल्यानंतर या निवडणुकीत विजयाची समीकरणं बदलली होती. अहमद पटेलांना विजयासाठी 43.5 मतांची आवश्यकता होती. पण त्यांना 44 मतं मिळाली. अहमद पटेलांना जी 44 मतं मिळाली, त्यातील 41 काँग्रेस, जेडीयू एक, राष्ट्रवादी काँग्रेस एक आणि भाजपच्या एका बंडखोर आमदाराच्या मताचा समावेश होता.

दुसरीकडे शंकरसिंह वाघेलांसह एकूण आठ आमदारांना काँग्रेसनं निलंबित केलं असून, त्यांनी मंगळवारी क्रॉस वोटिंग केलं होतं. काँग्रेसनं याप्रकरणी कारवाई करत, आठही आमदारांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे.

India News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:shanker singh vaghela critisied to congress on ahmed-patel win
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

राजधानी एक्स्प्रेसवर आतापर्यंतचा सर्वात मोठा दरोडा
राजधानी एक्स्प्रेसवर आतापर्यंतचा सर्वात मोठा दरोडा

नवी दिल्ली : सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या राजधानी

'लष्कर-ए-तोयबा'चा कमांडर अयुब लेलहारीला कंठस्नान
'लष्कर-ए-तोयबा'चा कमांडर अयुब लेलहारीला कंठस्नान

नवी दिल्ली : भारतीय सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तोयबाचा कुख्यात दहशतवादी

हिजबुल मुजाहिद्दीन अमेरिकेकडून दहशतवादी संघटना घोषित
हिजबुल मुजाहिद्दीन अमेरिकेकडून दहशतवादी संघटना घोषित

नवी दिल्ली : काश्मिर खोऱ्यात दहशतवादी कारवाया करणाऱ्या हिजबुल

5 रुपयात नाश्ता, 10 रुपयात जेवण.. बंगळुरुत ‘इंदिरा कॅन्टीन’ सुरु
5 रुपयात नाश्ता, 10 रुपयात जेवण.. बंगळुरुत ‘इंदिरा कॅन्टीन’ सुरु

बंगळुरु : कामगार आणि गरिबांना स्वस्तात जेवण मिळावं यासाठी बंगळुरूत

स्वातंत्र्यदिनाचं माझं भाषण प्रसारित केलं नाही, त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांचा आरोप
स्वातंत्र्यदिनाचं माझं भाषण प्रसारित केलं नाही, त्रिपुराच्या...

अगरताळा : स्वातंत्र्यदिनानिमित्तानं केलेलं भाषण दूरदर्शन आणि

मित्रांची बाईक रेस, हेल्मेटला कॅमेरा, भिंतीला धडकून जीव गेला!
मित्रांची बाईक रेस, हेल्मेटला कॅमेरा, भिंतीला धडकून जीव गेला!

नवी दिल्ली: दिल्लीत मित्रांसोबत लावलेली बाईक रेस एका तरुणाच्या आणि

'लव्ह जिहाद' प्रकरणाचा तपास NIA ने करावा, सुप्रीम कोर्टाचे आदेश
'लव्ह जिहाद' प्रकरणाचा तपास NIA ने करावा, सुप्रीम कोर्टाचे आदेश

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने केरळमधील कथित लव्ह जिहाद प्रकरणाचा

'रोहित वेमुला दलित नव्हता, नैराश्येतून त्याची आत्महत्या'
'रोहित वेमुला दलित नव्हता, नैराश्येतून त्याची आत्महत्या'

नवी दिल्ली: हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुला दलित

श्रीनगरच्या लाल चौकात महिलेकडून 'भारत माता की जय'चे नारे
श्रीनगरच्या लाल चौकात महिलेकडून 'भारत माता की जय'चे नारे

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या लाल चौकात एका महिलेने ‘भारत माता की

बिहारमध्ये पुराचं थैमान, 56 जणांचा मृत्यू, 70 लाख नागरिकांना फटका
बिहारमध्ये पुराचं थैमान, 56 जणांचा मृत्यू, 70 लाख नागरिकांना फटका

पाटणा: बिहारमध्ये आलेल्या महापुराने आतापर्यंत 56 जणांचा बळी घेतला