यूपीएच्या बैठकीला शरद पवार गैरहजर

सोनिया गांधींनी आज (शुक्रवार) दिल्लीत बोलावलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गैरहजर होते.

यूपीएच्या बैठकीला शरद पवार गैरहजर

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी आज (शुक्रवार) दिल्लीत बोलावलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गैरहजर होते. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

सरकारविरोधात रणनिती ठरवण्यासाठी सोनिया गांधी यांच्या अक्ष्यक्षतेखाली 18 विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलवण्यात आली होती. मात्र, त्या बैठकीला शरद पवारांनी दांडी मारली.

दरम्यान, गुजरात राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं व्हीप जारी केल्यानंतरही NCPनं काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान न केल्याचा आरोप काँग्रेसकडून सुरु आहे. या प्रकरणावरुन दोन्ही पक्षामध्ये सध्या अविश्वासाचं वातावरण आहे. त्यामुळे देखील आजच्या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते गैरहजर होते. असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

‘काँग्रेसनं आमच्यावर विश्वास ठेवायला हवा होता.’ असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी याप्रकरणी आपली नाराजीही व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या :

गुजरात राज्यसभा निवडणूक : अटीतटीच्या लढतीत अहमद पटेल विजयी


अखेर काँग्रेसच्या चाणक्याची बाजी यशस्वी, अहमद पटेल विजयी!

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV