शरद यादव यांना जेडीयूच्या राज्यसभा गट नेतेपदावरुन हटवलं!

जेडीयूच्या खासदारांची आज सायंकाळी 5 वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत अधिकृतपणे निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे.

By: | Last Updated: > Saturday, 12 August 2017 1:37 PM
Sharad yadav removed as party leader in rajya sabha

नवी दिल्ली : बिहारच्या राजकारणात आणखी एक मोठी घडामोड घडली आहे. सतत पक्षविरोधी भूमिका ठेवल्याने जेडीयूचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शरद यादव यांना जेडीयूच्या राज्यसभेच्या गट नेतेपदावरुन हटवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.

शरद यादव यांच्या जागी आरसीपी सिंह यांची गट नेतेपदी नियुक्ती केली जाणार आहे. जेडीयूच्या खासदारांची आज सायंकाळी 5 वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत अधिकृतपणे निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे.

बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आरजेडीचे लालू प्रसाद यादव यांच्यासोबतच्या वादानंतर भाजपसोबत सत्ता स्थापन केली.

यापूर्वी शरद यादव दिल्लीतून पाटण्यात दाखल झाल्यानंतर, आपण महायुतीसोबत असल्याचं वक्तव्य केलं होतं. तसेच बिहारच्या 11 कोटी जनतेने 2015 च्या विधानसभा निवडणुकीत पाच वर्षांसाठी महायुतीला जनादेश दिला होता, असं म्हणतं नितीश कुमारांना घरचा आहेर दिला होता.

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या संपत्तीवरील सीबीआयच्या छापेमारीनंतर, नितीश कुमारांनी 26 जुलै रोजी स्वत: च आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. पण दुसऱ्याच दिवशी म्हणजे, 27 जुलै रोजी भाजपसोबत युती करत, पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

नितीश कुमार बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर, आज पंतप्रधान मोदींची भेट घेतली. या भेटीत बिहारच्या विकासासंबंधी विविध विषयांवर चर्चा झाली. तसेच यानंतरही आपण पुन्हा मोदींच्या भेटीसाठी दिल्लीत येणार असल्याचं, माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.

दुसरीकडे राजेडी अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी जेडीयूमधील फुटीवरुन नितीश कुमारांवर निशाणा साधला होता. नितीश कुमारांनी शरद यादव यांना धोका दिल्याचं सांगत, शरद यादव पाटण्याला आल्यानंतर जदयूचे कार्यकर्ते त्यांचा विरोध करतील आणि नितीश कुमारांच्या इशाऱ्यावर त्यांच्यावर हल्लाही होऊ शकतो, असा आरोप लालू यादव यांनी केला होता. त्यांच्या पक्षाची शरद यादव यांच्या जेडीयूशी युती कायम राहिल, असंही लालू म्हणाले होतं.

संबंधित बातम्या

शरद यादव यांची जेडीयूमधून हकालपट्टी होणार?

नितीश कुमारांचा अंतरात्मा पंतप्रधान मोदींमध्ये आहे का? : तेजस्वी यादव

नितीश कुमार सत्तेचे भुकेले, लालूप्रसाद यादव यांचं टीकास्त्र

बिहारमध्ये आणखी एक भूकंप, जेडीयूमध्ये फूट?

India News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Sharad yadav removed as party leader in rajya sabha
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

उत्तर प्रदेशात 7000 हून जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या पत्राचं वाटप
उत्तर प्रदेशात 7000 हून जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या पत्राचं वाटप

लखनऊ : उत्तर प्रदेशातील 7574 शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या पत्राचं वाटप

2019 साठी भाजपचं ‘मिशन 350 प्लस’, अमित शाहांचा निर्धार
2019 साठी भाजपचं ‘मिशन 350 प्लस’, अमित शाहांचा निर्धार

नवी दिल्ली : आगामी 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच

VIDEO : बिहारमध्ये महापूर, पूल कोसळल्याने तिघेजण वाहून गेले!
VIDEO : बिहारमध्ये महापूर, पूल कोसळल्याने तिघेजण वाहून गेले!

पाटणा : बिहारमधील महापूर काही कमी होण्याचं नाव घेत नाही. याच

सत्तेत आल्यावर संघाला तिरंग्याची आठवण : राहुल गांधी
सत्तेत आल्यावर संघाला तिरंग्याची आठवण : राहुल गांधी

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी

एचडीएफसी बचत खात्याच्या व्याज दरात कपात
एचडीएफसी बचत खात्याच्या व्याज दरात कपात

मुंबई : एचडीएफसी बँकेने आपल्या बचत खात्याच्या व्याज दरात कपात केली

सरसंघचालकांना ध्वजारोहणापासून रोखणाऱ्या जिल्हाधिकाऱ्याची बदली
सरसंघचालकांना ध्वजारोहणापासून रोखणाऱ्या जिल्हाधिकाऱ्याची बदली

तिरुअनंतपूरम (केरळ): राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन

दिल्ली हायकोर्ट बॉम्बने उडवू, फोननंतर पोलिसांची धावाधाव
दिल्ली हायकोर्ट बॉम्बने उडवू, फोननंतर पोलिसांची धावाधाव

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालय परिसरात हायअलर्ट जारी करण्यात आला

बर्थडे पार्टीदरम्यान हवाई सुंदरीचा संशयास्पद मृत्यू
बर्थडे पार्टीदरम्यान हवाई सुंदरीचा संशयास्पद मृत्यू

कोलकाता : कोलकातामध्ये एका 22 वर्षीय हवाई सुंदरीचा संशयास्पद मृत्यू

कोपर्डी बलात्कार: आरोपींची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
कोपर्डी बलात्कार: आरोपींची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

नवी दिल्ली : राज्यासह देशभरात चर्चित असलेल्या कोपर्डी बलात्कार

रस्त्यावरील नमाज रोखू शकत नाही, तर जन्माष्टमीही रोखण्याचा अधिकार नाही: योगी
रस्त्यावरील नमाज रोखू शकत नाही, तर जन्माष्टमीही रोखण्याचा अधिकार...

लखनऊ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी धार्मिक