मध्य प्रदेशचे रस्ते अमेरिकेपेक्षा गुळगुळीत, खोटं बोलणाऱ्या मुख्यमंत्र्यांना ट्विटरवर धुतलं!

मध्य प्रदेशातील रस्ते हे अमेरिकेतील रस्त्यांपेक्षा उत्तम आणि गुळगुळीत आहेत, असा दावा शिवराजसिंहांनी अमेरिकेत केला.

मध्य प्रदेशचे रस्ते अमेरिकेपेक्षा गुळगुळीत, खोटं बोलणाऱ्या मुख्यमंत्र्यांना ट्विटरवर धुतलं!

वॉशिंग्टन:  अमेरिका दौऱ्यावर असलेले मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना रेटून खोटं बोलणं महागात पडलं.

मध्य प्रदेशातील रस्ते हे अमेरिकेतील रस्त्यांपेक्षा उत्तम आणि गुळगुळीत आहेत, असा दावा शिवराजसिंहांनी अमेरिकेत केला. मात्र त्यांच्या या वक्तव्यानंतर शिवराजसिंहांना सोशल मीडियातून ट्रोल करण्यात येत आहे.

शिवराजसिंह हे मध्य प्रदेशात परदेशी गुंतवणूक वाढावी यासाठी यूएस इंडिया स्ट्रॅटेजिक फोरममध्ये सहभागी झाले आहेत.

https://twitter.com/ANI/status/922837634744950785

यावेळी शिवराज म्हणाले, “मी गेल्या 12 वर्षांपासून मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री आहे. पायाभूत सुविधांशिवाय कोणतंही राज्य पुढे जाऊ शकत नाही. त्यासाठी सर्वात आधी आम्ही रस्ते बनवले. ज्यावेळी मी अमेरिकेत विमानतळावर उतरलो आणि रस्त्याने आलो, तेव्हा मला वाटलं की मध्य प्रदेशचे रस्ते हे अमेरिकपेक्षा उत्तम आहेत”.

शिवराज यांचं वक्तव्य वायूवेगानं व्हायरल झालं आणि लोकांनी हसा लेको स्टाईलमध्ये त्याची खिल्ली उडवली.

शिवराज यांच्या वक्तव्यानंतर लोकांनी ट्विटरवर तऱ्हेऱ्हेचे फोटो टाकायला सुरुवात केली.

https://twitter.com/iamjee2/status/922870382348025856

कुणीतरी पूर स्थितीचा दौरा करतानाचा फोटो टाकला, आणि त्यावर मुख्यमंत्री रस्ते सफाईची पाहणी करताना अशी टॅगलाईन हाणली.

https://twitter.com/mohitraj/status/922868092320980992

एकानं तर कहर केला, पहिलं चित्र वॉशिंग्टन डीसीचं तर दुसरं मध्य प्रदेशचं असल्याचं म्हटलं.

https://twitter.com/RoflGujarati_/status/922878880679059457

तर एका फोटोवर हा रस्ता मध्य प्रदेशातील मंदसौरचा असल्याचं लिहिलं..

https://twitter.com/fazlurism/status/922870789921112065

अभिनेते अनुपम खेर यांच्या नावाचं पॅरोडी अकाऊंट आहे, त्यावर कुणीतरी रतलामच्या दीन दयाल कॉलनीतला हा अप्रतिम नजारा बघा, म्हणत शिवराज यांची खिल्ली उडवली.

https://twitter.com/Kumar_Ke5hav/status/922871178556928001

https://twitter.com/sagarcasm/status/922865138004140037

https://twitter.com/runjhunmehrotra/status/922867381319245824

https://twitter.com/Hasanraza0007/status/922905271160180737

आता शिवराज यांनी केलेल्या हास्यास्पद वक्तव्याचं वास्तव बघा..

2015 च्या एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार

-मध्य प्रदेशात रोज 112 रस्ते अपघात होतात

-त्यात 27 लोकांचा जीव जातो

- रस्ते अपघातात एमपी चौथ्या नंबरवर आहे.

शिवराज यांना वाटलं की अमेरिकेत काहीही पुड्या सोडल्या तरी काय कळणाराय? पण सोशल मीडियाचं लचांड किती भयानक आहे, याचा अनुभव शिवराज यांना आला असेल. त्यामुळे खोटं बोल पण रेटून बोल असला धंदा बंद थांबवलेलाच बरा.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV