मी संन्यासी, मला ‘पद्मश्री’ नको, सिद्धेश्वर स्वामींनी पुरस्कार नाकारला

विजापूर येथील ज्ञानयोग मठाचे स्वामी प. पू. सिद्धेश्वर स्वामी हे त्यांच्या साधी राहणी, तसेच आपल्या रसाळ वाणीबद्दल प्रसिद्ध आहेत.

मी संन्यासी, मला ‘पद्मश्री’ नको, सिद्धेश्वर स्वामींनी पुरस्कार नाकारला

बेळगाव : विजापूर येथील ज्ञानयोग आश्रमाचे प. पू. सिद्धेश्वर स्वामींनी ‘पद्मश्री’ पुरस्कार नाकारला आहे. आपल्याला जाहीर करण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार स्वीकारणार नसल्याचे त्यांनी नम्रपणे एका पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

विजापूर येथील ज्ञानयोग आश्रमाचे प. पू. सिद्धेश्वर स्वामी याना प्रजासत्ताक दिनी पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. पद्मश्री पुरस्काराची बातमी कळल्यावर सिद्धेश्वर स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. त्या पत्राद्वारे आपणास  जाहीर करण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार स्वीकारणार नसल्याचे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळविले आहे.

मी संन्यासी आहे, त्यामुळे हा पुरस्कार मी स्वीकारु शकत नाही, असे स्वामींनी कळवले आहे.

विजापूर येथील ज्ञानयोग मठाचे स्वामी प. पू. सिद्धेश्वर स्वामी हे त्यांच्या साधी राहणी, तसेच आपल्या रसाळ वाणीबद्दल प्रसिद्ध आहेत. कधीही कोणताही बडेजाव ते मारत नाहीत. त्यांचे व्याख्यान ऐकणे ही एक पर्वणीच असते. दैनंदिन जीवन जगताना अध्यात्माची सांगड कशी घालायची याविषयीचे त्यांचे विचार ऐकण्यासाठी भक्त गर्दी करतात.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Siddhshwar Swami rejects Padmsree Award latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV