सिद्धू दिवसा मंत्रालयात, रात्री कॉमेडी शोमध्ये दिसणार

सिद्धू दिवसा मंत्रालयात, रात्री कॉमेडी शोमध्ये दिसणार

चंदीगड : पंजाबच्या मंत्रिपदी शपथ घेतल्यानंतर माजी क्रिकेटर नवज्योत सिंह सिद्धू यांनी पहिल्यांदाच माध्यमांशी बातचीत केली. पंजाबच्या विकासाला प्राधान्य आहेच, मात्र कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्येही काम करत राहील, असं सिद्धूंनी स्पष्ट केलं.

कार्यक्रमची शूटिंग रात्री पूर्ण केली जाईल. शोमध्ये सिद्धू जजच्या भूमिकेत दिसतात. मंत्रालयाचं काम दिवसभर चालतं, त्यामुळे रात्री शूटिंग पूर्ण करत जाईल, असं सिद्धूंनी सांगितलं.

दरम्यान सिद्धूंना उपमुख्यमंत्रिपद दिलं असतं तर त्यांनी कॉमेडी शोमध्ये सहभागी होणं बंद केलं असतं, असं बोललं जातं. मात्र त्यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं आहे. त्यामुळे आपली सेलिब्रिटी ओळख जपण्यासाठीही सिद्धू प्रयत्न करतील.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV