स्नेहलता श्रीवास्तव लोकसभेच्या पहिल्या महिला सरचिटणीस

मध्य प्रदेश कॅडरच्या 1982 च्या बॅचमधील स्नेहलता श्रीवास्तव यांनी केंद्र सरकारच्या न्याय विभाग, वित्त मंत्रालय आणि नाबार्ड सारख्या ठिकाणी काम केलं आहे.

स्नेहलता श्रीवास्तव लोकसभेच्या पहिल्या महिला सरचिटणीस

नवी दिल्ली : लोकसभेच्या सरचिटणीसपदी स्नेहलता श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्नेहलता या लोकसभेच्या पहिल्या महिला सरचिटणीस ठरल्या आहेत.

लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी शुक्रवारी श्रीवास्तव यांची सभागृहाला ओळख करुन दिली. स्नेहलता श्रीवास्तव यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर 2018 पर्यंत असेल.

विद्यमान सरचिटणीस अनुप मिश्रा यांच्याकडून स्नेहलता श्रीवास्तव पदभार स्वीकारतील.

यापूर्वी राज्यसभेत रमा देवी या पहिल्या महिला सरचिटणीस म्हणून कार्यरत राहिल्या आहेत. मात्र लोकसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच एक महिला सरचिटणीसपदी विराजमान होत आहे.

मध्य प्रदेश कॅडरच्या 1982 च्या बॅचमधील स्नेहलता श्रीवास्तव यांनी केंद्र सरकारच्या न्याय विभाग, वित्त मंत्रालय आणि नाबार्ड सारख्या ठिकाणी काम केलं आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Snehalata Srivastav became Lokasabha’s first woman general Seceratary latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV