हॉटेलबाहेर सायकलिंग, नागरिकांसोबत सेल्फी, सोनिया गांधी गोव्यात

सोनिया गांधी यांना मानणाऱ्या काही जणांनी सेल्फीसाठी विनंती केली असता, त्यांनी आपल्यासोबत सेल्फीही घेऊ दिले.

हॉटेलबाहेर सायकलिंग, नागरिकांसोबत सेल्फी, सोनिया गांधी गोव्यात

पणजी (गोवा) : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी गोव्यात सुट्टीवर आल्या आहेत. 26 डिसेंबर रोजी त्या दिल्लीहून गोव्याला रवाना झाल्या होत्या. दक्षिण गोव्यातील लीला या पंचतारांकित हॉटेलमध्ये काही मोजक्या मित्रमंडळींसह त्या आल्या वास्तव्यास आहेत.

सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत केल्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात त्या गोव्याचा निरोप घेतील.

बुधवारी सकाळी नाश्त्यात त्यांनी आवडता मसाला डोसा मागवला. त्यानंतर हॉटेलच्या आवारात मनमुराद सायकलिंग केले. तसेच विदेशांतील पाहुण्यांशी चर्चा केली.

https://twitter.com/Riteishd/status/946194751933616128

सोनिया गांधी यांना मानणाऱ्या काही जणांनी सेल्फीसाठी विनंती केली असता, त्यांनी आपल्यासोबत सेल्फीही घेऊ दिले. योगा करण्याबरोबरच पुस्तकांचे वाचन करून त्या वेळ व्यतित करत आहेत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, बातम्यांपासून दूर राहण्याची खबरदारीही त्या घेत आहेत.

सोनिया गांधी राहत असलेले दक्षिण गोव्यातील हे हॉटेल त्यांचे आवडते ठिकाणी असून, त्या यापूर्वीही येथे राहिल्या आहेत. मध्यंतरी दिल्लीत प्रदूषणाची पातळी वाढल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या काही दिवसांकरिता गोव्यात आल्या होत्या.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Sonia Gandhi enjoys vacations in Goa latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV