मोदींचा विजयरथ रोखण्यासाठी सोनिया गांधींची डिनर डिप्लोमसी

2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांची मोट बांधण्यासाठी सोनिया गांधींनी विरोधकांना एकत्र बोलावलं आहे. यामध्ये काँग्रेससह 20 पक्षांचा समावेश आहे.

मोदींचा विजयरथ रोखण्यासाठी सोनिया गांधींची डिनर डिप्लोमसी

नवी दिल्ली : 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांना मजबूत करण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतलाय. यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी 19 विरोधी पक्षांना डिनरसाठी निमंत्रण दिलं आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सीताराम येचुरी सहभागी होणार आहेत. तर तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओ ब्रायन हे ममता बॅनर्जींचं प्रतिनिधित्व करतील.

डिनरसाठी कोणकोणत्या नेत्यांना निमंत्रण?

समाजवादी पक्षाकडून रामगोपाल यादव, एआययूडीएफचे बदरुद्दीन अजमल, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल, आरजेडीमधून मीसा भारती आणि जय प्रकाश यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे फारुक अब्दुल्ला आणि उमर अब्दुल्ला, झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन, झारखंड विकास मोर्चाचे बाबू लाल मरांडी, राष्ट्रीय लोकदलचे अजित सिंह आणि जयंत सिंह, सीपीआयचे डी राजा, सीपीएमचे सीताराम येचुरी आणि मोहम्मद सलीम, तामिळनाडूतील पक्ष डीएमकेचे कनिमोझी, बसपाचे सतीश चंद्रा, भारतीय ट्रायबल पक्षाचे शरद यादव, तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओ ब्रायन आणि सुदीप बंदोपाध्याय, हिंदुस्तान अवाम मोर्चाचे जीतन राम मांझी या नेत्यांची सोनिया गांधींनी आयोजित केलेल्या डिनरसाठी उपस्थिती असेल.

याशिवाय आययूएमएल, आरएसपी, केरळ काँग्रेस, जनता दल सेक्युलरचे आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसह पक्षातील वरिष्ठ नेते उपस्थित असतील. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांची मोट बांधण्यासाठी सोनिया गांधींनी विरोधकांना एकत्र बोलावलं आहे. यामध्ये काँग्रेससह 20 पक्षांचा समावेश आहे.

2019 च्या निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात विरोधी पक्षांना मजबूतपणे उभं करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. विरोधकांनी एकत्र येत लढल्यास मोदी लाट रोखता येईल, असं काँग्रेसचं म्हणणं आहे. 16, 17 आणि 18 मार्च रोजी होणाऱ्या पक्षाच्या अधिवेशनात काँग्रेसकडून युतीचा प्रस्ताव सादर केला जाऊ शकतो.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Sonia Gandhi to host dinner for opposition parties ahead of 2019 loksabha election
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV