अजानबद्दलच्या ट्वीटनंतर सोनू निगमचा माफीनामा

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Wednesday, 19 April 2017 6:26 PM
अजानबद्दलच्या ट्वीटनंतर सोनू निगमचा माफीनामा

मुंबई : “मी मुस्लीमविरोधी नाही. फक्त अजानबाबत बोललो नव्हतो तर मंदिरं, गुरुद्वारांच्या लाऊडस्पीकरबद्दलही बोललो. माझ्याकडून काही चूक झाली असेल तर माफ करा,” असं म्हणत गायक सोनू निगमने अजानप्रकरणी माफी मागितली.

‘मी मुस्लीम नाही आणि तरीही मला अजानच्या आवाजामुळे झोपेतून उठावं लागतं. भारतातील जबरदस्तीची ही धर्मिकता कधी संपेल?’, असा सवाल सोनू निगमने ट्विटरवर केला होता.

सोनू निगमच्या अजानसंदर्भातील ट्वीटनंतर मुस्लीम कट्टरतावाद्यांनी त्याच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. त्यानंतर आज सोनू निगमने पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली.

अजानबद्दलच्या ट्वीटनंतर सोनू निगमला एका मौलानाने टक्कल करुन फिरवण्याची धमकी दिली होती. त्यानंतर सोनू निगम स्वत: आपल्या डोक्यावरचे केस कापून माध्यमांसमोर हजर झाला.

Sonu_Nigam

सोनू म्हणाला की, “मी एका सामाजिक प्रश्नाबद्दल बोललो, धार्मिक नाही. माझ्यासाठी सर्व धर्म समान आहेत. मी मोहम्मद रफी यांना वडील मानलं आहे. माझा ड्रायव्हर मुस्लीम आहे. जे लोक मला मुस्लीमविरोधी बोलत आहे, तर तो माझा नाही त्यांचा प्रॉब्लेम आहे.

लाऊडस्पीकर ही धार्मिक गरज नाही. माझ्यामते, लाऊडस्पीकर गुंडगिरी आहे. धर्माच्या नावावर लोक दारु पिऊन नाचतात ही गुंडगिरीच आहे. मी स्वत:ला धर्मनिरपेक्ष समजतो. माझी चूक असेल तर मला माफ करा.

मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या. मला माझं मत मत मांडण्याचा अधिकार आहे तसा तुम्हालाही माझं मतं आवडलं नाही ते सांगण्याचा अधिकार आहे. ट्विटरवर एखाद्याला लिहायचं असेल तर कमी शब्दात लिहावं लागतं. त्यामुळेच मी मोहम्मद साहेब लिहिलं नाही.

मंदिरात आरती गरजेची आहे, लाऊडस्पीकर नाही. मी पहिला देशाचा नागरिक आहे, त्यानंतर कलाकार आहे. पण माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला.”

संबंधित बातम्या

मशिदींवरील भोंग्यांमुळे माझी झोपमोड का? : सोनू निगम

‘अजान जरुरी, लाऊडस्पीकर नाही’, सोनू निगमच्या ट्वीटवर अहमद पटेलांचं वक्तव्य

First Published: Wednesday, 19 April 2017 3:19 PM

Related Stories

कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी भारताचे जोरदार प्रयत्न
कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी...

नवी दिल्ली : पाकिस्ताननं फाशीची शिक्षा सुनावलेले भारताचे नौदलातील

नोटाबंदीच्या परिणामांची लाट ओसरली, महानगरांमधील घर खरेदीचं प्रमाण घटलं
नोटाबंदीच्या परिणामांची लाट ओसरली,...

नवी दिल्ली : गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्री मोदींनी नोटाबंदीच्या

'क्योंकि सास भी...'च्या शीर्षक गीतावर भांगडा, स्मृती इराणी म्हणतात...
'क्योंकि सास भी...'च्या शीर्षक गीतावर...

नवी दिल्ली : गेल्या दशकाच्या सुरुवातीला टेलिव्हिजन जगतात स्टार

बाबरी प्रकरणातील आरोपींचं 'पद्मविभूषण' काढणार का? : ओवेसी
बाबरी प्रकरणातील आरोपींचं...

मुंबई : बाबरी मशिद प्रकरणी न्यायालयात होत असलेल्या दिरंगाईवर

मतदानानंतर पावती मिळणार, नव्या ईव्हीएमला केंद्राची मंजुरी
मतदानानंतर पावती मिळणार, नव्या...

नवी दिल्ली: ईव्हीएम घोळाच्या तक्रारी झाल्यानंतर आता नव्या

आज रात्रीच अयोध्येला जाणार : उमा भारती
आज रात्रीच अयोध्येला जाणार : उमा भारती

नवी दिल्ली : अयोध्या, गंगा आणि तिरंग्यासाठी जीव द्यायलाही तयार आहे.

बीएसएफचे जवान तेज बहाद्दूर बडतर्फ
बीएसएफचे जवान तेज बहाद्दूर बडतर्फ

नवी दिल्ली : सीमा सुरक्षा दल अर्थात बीएसएफचे जवान तेज बहाद्दूर

एका रसगुल्ल्यावरुन भर मंडपात राडा, लग्नच मोडलं!
एका रसगुल्ल्यावरुन भर मंडपात राडा,...

लखनौ: सध्या जोरदार लग्नसराई सुरु आहे. लग्न म्हटलं की, धमाल, मस्ती आणि

हिमाचल प्रदेशमध्ये बस नदीत कोसळली, 43 जणांचा मृत्यू
हिमाचल प्रदेशमध्ये बस नदीत कोसळली, 43...

शिमला : हिमाचल प्रदेशमधील शिमला जिल्ह्यातील टॉन्स नदीत बस

राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचा लाल दिवा कायमचा बंद!
राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून...

नवी दिल्ली:1 मे च्या कामगार दिनापासून व्हीव्हीआयपींचं लालदिव्याचं