पेट्रोल-डिझेलवरील अबकारी कर कमी होणार नाही, सुत्रांची माहिती

पेट्रोल-डिझेलवरील अबकारी कर कमी होणार नसल्याचं सुत्रांकडून कळतं आहे. सध्याची वित्तीय तूट जास्त असल्यानं हा कर घटवणं अशक्य असल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे.

पेट्रोल-डिझेलवरील अबकारी कर कमी होणार नाही, सुत्रांची माहिती

 

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलचे वाढलेले दर येत्या काही काळात कमी होण्याची शक्यता कमी आहे. कारण, पेट्रोल-डिझेलवरील अबकारी कर कमी होणार नसल्याचं सुत्रांकडून कळतं आहे. सध्याची वित्तीय तूट जास्त असल्यानं हा कर घटवणं अशक्य असल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे.

पेट्रोल-डिझेलवर जीएसटी लागू झाल्यानंतर अबकारी कर कमी करता येऊ शकतो. मात्र तोपर्यंत हा कर कमी होणार नसल्याचं कळतं आहे. सध्या एक लिटर पेट्रोलवर 19.48 रुपये अबकारी कर आकारला जातो. तर एक लिटर डिझेलवर 15.33 रुपये कर आकारला जातो.

याशिवाय विक्रीकरही आकारण्यात येतो, त्यामुळं सध्या देशभरात पेट्रोलचे दर 80 रुपयांच्या पुढं गेले आहेत. संविधान संशोधन करुन पेट्रोल-डिझेलवर जीएसटी लागू झाल्यानंतर या करापासून सुटका मिळू शकते.

संबंधित बातम्या

अर्थसंकल्पात पेट्रोल, डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी होणार?

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: No cut of excise duty on petrol
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV