अरविंद केजरीवालांची चोरीला गेलेली कार अखेर सापडली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चोरीला गेलेली कार अखेर सापडली. गाझियाबादच्या मोहननगर परिसरात ही कार सापडल्याचं पोलिसांनी सांगितलं.

अरविंद केजरीवालांची चोरीला गेलेली कार अखेर सापडली

दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चोरीला गेलेली कार अखेर सापडली. गाझियाबादच्या मोहननगर परिसरात ही कार सापडल्याचं पोलिसांनी सांगितलं. 3 दिवसांपूर्वी दिल्लीतल्या सचिवालयातून ही कार चोरी करण्यात आली होती.

केजरीवालांची गाडी चोरीला गेल्यानंतर राज्यपालांना खरमरीत पत्र लिहिलं. यानंतर तातडीनं पोलिसांनी या गाडीचा शोध घेण्यास सुरुवात केली. आज अखेर ही गाडी पोलिसांना सापडल्याचं कळतं आहे.

दिल्ली निवडणुकांदरम्यान अरविंद केजरीवाल याच गाडीमधून आपल्या निवडणुक प्रचारासाठी जात होते. शिवाय मुख्यमंत्री झाल्यापासून ते याच गाडीचा वापर करतात. त्यामुळं या गाडीची सोशल मीडियावर मोठी चर्चा होती. मात्र ही गाडी चोरीला गेल्यानंतर एकच खळबळ माजली होती.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV