जैश-ए-मोहम्मदच्या कमांडरचा दक्षिण काश्मिरात एन्काऊंटर

सुंजवान हल्ला आणि दक्षिण काश्मीरच्या लैथपुरातील सीआरपीएफ कॅम्पवरील आत्मघातकी हल्ल्याचा मुफ्ती वकास हा मास्टरमाईंड होता.

जैश-ए-मोहम्मदच्या कमांडरचा दक्षिण काश्मिरात एन्काऊंटर

नवी दिल्ली : सुंजवान हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी मुफ्ती वकासचा खात्मा करण्यात भारतीय सैन्याला यश आले आहे. दक्षिण काश्मीरच्या अवंतीपुरामध्ये चकमकीत वकासला ठार करण्यात आले.

सैन्याच्या माहितीनुसार, माहिती मिळाल्यानंतर सैन्याचं एक पथकाने स्पेशल ऑपरेशन ग्रुपसोबत अवंतीपुरातील हटवार परिसराला घेराव घातला गेला आणि प्रत्येक घराची तपासणी करण्यात आली. यावेळी जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी मुफ्ती वकासला ठार करण्यात आले.

सुंजवान हल्ला आणि दक्षिण काश्मीरच्या लैथपुरातील सीआरपीएफ कॅम्पवरील आत्मघातकी हल्ल्याचा मुफ्ती वकास हा मास्टरमाईंड होता.

सैन्याच्या माहितीनुसार, या चकमकीत स्थानिक नागरिकांना कोणतीही हानी झाली नाही. शिवाय, इतर कोणते नुकसानही झाले नाही.

मुफ्ती वकासच्या खात्म्याने जैश-ए-मोहम्मदच्या कारस्थानांना मोठा झटका मानला जात आहे. याच परिसरात 17 डिसेंबरला नूर मोहम्मद या जैशच्या आणखी एका दहशतवाद्याला ठार मारण्यात आले होते.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Sunjuwan Attack Mastermind Mufti Waqas Killed By Army
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV